जामखेड न्युज——
कार्यकर्त्यांनी केला नेत्याचा शब्द पूर्ण
मृत्यूनंतर बक्षिसाची रक्कम एकत्र करत केली सुपुर्द
दिवंगत हनुमंत पाटील यांच्या वतीचे बक्षीस कार्यकर्त्यांनी केले आयोजकाकडे सुपुर्द

क्रिकेट स्पर्धेत बक्षीस जाहीर केल्यानंतर स्पर्धेपूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्याचे अकाली निधन झाले. कार्यकर्त्यांनी मात्र, त्या बक्षिसांची रक्कम गोळा करत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सदर रक्कम आयोजकांना देऊन आपल्या नेत्याचा शब्द त्यांच्या मृत्यूनंतरही पूर्ण केला.

जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे स्थानिक तरुणांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार यांच्या नावाने ‘आमदार चषक’ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले.

या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साकतचे माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत हनुमंत पाटील यांनी तिसऱ्या क्रमांकावरील संघासाठी बक्षीस मोठ्या रकमेचे बक्षिस जाहीर केले होते.

पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुका उपाध्यक्ष हनुमंत पाटील यांचे अल्पशा आजाराने अकाली निधन झाले.






