प्रा. राम शिंदे साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करतील – उद्योजक आकाश बाफना
बाफना परिवाराच्या वतीने सभापती प्रा. राम शिंदे यांचा सत्कार
कर्जत जामखेड मतदारसंघाचे भाग्य विधाते प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेचे सभापती पदी निवड झाली आहे. ही बाब मतदारसंघासाठी अभिमानाची आहे. भविष्यात शिंदे साहेब यापेक्षा मोठी जबाबदारी लिलया सांभाळतील व महाराष्ट्राचे नेतृत्व करतील असे मत युवा उद्योजक आकाश बाफना यांनी व्यक्त केले.
कर्जत/जामखेड मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने दाखवून दिले आहे की,आपला तो आपला आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्याला जपणारा नेता म्हणजेच प्रा राम शिंदे साहेब, विधान परिषदेच्या सभापती पदासाठी प्रा राम शिंदे साहेब यांची निवड झाली हे अभिमानास्पद असून येणाऱ्या काळात शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील. असे प्रतिपादन युवा उद्योजक आकाश बाफना यांनी केले.
आज दिनांक २८ रोजी सकाळी ११.०० वाजता माजी जिल्हा परिषद तथा उद्योगपती दिलीप बाफना यांच्या निवासस्थानी विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी युवा उद्योजक आकाश दिलीप बाफना व बाफना परिवार यांच्या वतीने प्राध्यापक राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष दिलीप गुगळे , उपाध्यक्ष महावीर बाफना, सेक्रेटरी शरद शिंगवी, भाजपा व्यापारी शहराध्यक्ष पिंटू बोरा, गौतम दादा बाफना, अभय बाफना, अनिल बाफना, मिथून बाफना,नगरसेवक दिगंबर चव्हाण,अशोक बाफना,रोशन बाफना,उमेश नगरे,अवधूत पवार,लहु शिंदे, शिवकुमार डोंगरे,विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.