जामखेड कृषी विभागातील कृषीऔषधे कचरा कुंडीत स्वच्छता मोहीमेंतर्गत वीस वर्षांपूर्वीचे कालबाह्य औषधे व कागदपत्रे आहेत – कृषी अधिकारी घुले

0
849

जामखेड न्युज——

जामखेड कृषी विभागातील कृषी औषधे कचरा कुंडीत

स्वच्छता मोहीमेंतर्गत वीस वर्षांपूर्वीचे कालबाह्य औषधे व कागदपत्रे आहेत – कृषी अधिकारी घुले

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत अनेक योजना आहेत. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात प्रोत्साहन देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. पण अधिकारी वर्गाच्या निष्काळजीपणा मुळे शासनाच्या योजना अनेक ठिकाणी कागदपत्री राबविल्या जातात. तर काही ठिकाणी महागा मोलाचे औषधे मुदत संपल्याने कचरा कुंडीत दिसतात.

जामखेड कृषी विभागाच्या मेन गेट जवळ अशा प्रकारे एक्सपायर झालेले औषध टाकले गेले आहेत शेतकऱ्यांना मिळत नाहीत व कचऱ्यात एक मोठी फाईल पडलेली आहे.

शासनाने शेतकऱ्यांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकरी यांना नवीन विहीरीचा लाभ योजना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, कृषी पायाभुत सुविधा निधी योजना, कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टी मिळतात
माती, बियाणे, सिंचन, यंत्रे, तंत्रज्ञान, पत, विमा, पिकाला संरक्षण, विपणन अशा अनेक योजना असतात.

जामखेड कृषी विभागाच्या कार्यालयासमोर कचरा कुंडामध्ये एक्सपायरी झालेले औषधे टाकून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना मात्र यापासून वंचित ठेवण्यात आले याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

चौकट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. 07 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी 100 दिवसांमध्ये 1) संकेतस्थळ (Website), 2) सुकर जीवनमान (Ease of Living), 3) स्वच्छता (Cleanliness), 4) जनतेच्या तक्रारींचे निवारण (Grievance Redressal), 5) कार्यालयातील सोयी व सुविधा (Amenities at work place), 6) गुंतवणूक प्रसार (Investment promotion), 7) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी (Field visits) या मुद्यांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जामखेड कृषी कार्यालयामार्फत स्वच्छता मोहीम सुरू आहे. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वीचे काही कालबाह्य कागदपत्रे व औषधे नष्ट करण्यासाठी व स्वच्छतेसाठी बाहेर टाकलेले आहेत. ते नष्ट करणार आहोत. कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
रविंद्र घुले कृषी अधिकारी जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here