अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य श्री शिवाजीराव ढाळे यांच्या पत्नी सौ.कुसुमावती शिवाजीराव ढाळे यांचे आज पहाटे 6:00 वाजता वयाच्या 65 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले झाले असून त्यांचा अंत्यविधी सकाळी 11:00 वाजता तपनेश्वर अमरधाम जामखेड येथे होणार आहे.
शिवाजीराव ढाळे हे राज्यपातळीवर शिक्षक संघटनेत काम करतात. त्यांनी शिक्षकांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. 2001 ते 2002 मध्ये राज्यातील पंचावन्न तुकड्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविला होता. सेवानिवृत्त होऊनही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच अग्रेसर असतात.
शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांना त्यांच्या पत्नी कुसुमावती यांची प्रत्येक कामात शिवाजीराव ढाळे यांना खंबीर साथ होती. त्यांच्या मागे पती, दोन मुली (विवाहित) एक मुलगा विवाहित असा परिवार आहे.