जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार रोहित पवार गटाला खिंडार
जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी मतदारसंघाचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोहित पवार यांच्या गटाचे राहुल शेठ बेदमुथा यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
यामुळे आमदार रोहित पवार गटाला खिंडार पडले आहे. तर सभापती प्रा राम शिंदे गटाचे सदस्य वाढले आहेत.
आज भाजपामध्ये प्रवेश करताना उपस्थित जेष्ठ नेते तथा संचालक अंकुश ढवळे पाटील, सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे उपस्थित होते.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन्ही गटाला नऊ नऊ जागा मिळाल्या होत्या. चिट्टीद्वारे सभापती निवड झाली होती. सभापती शरद कार्ले भाजपा यांची चिट्टी निघाली होती.
तर उपसभापती साठी रोहित पवार गटाचे कैलास वराट यांची चिट्टीद्वारे निवड झाली होती.
काही दिवसांपासून अकुंश ढवळे यांनी आमदार रोहित पवार गटाची साथ सोडून भाजपाच्या गटाशी घरोबा केला आहे.यामळे नऊ नऊ सदस्य असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आता भाजपाचे अकरा तर रोहित पवार गटाचे सातच सदस्य राहिले आहेत.