जामखेड कालिका पोदार लर्न स्कूलच्या आर्या औटेचा जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

0
304

जामखेड न्युज——

जामखेड कालिका पोदार लर्न स्कूलच्या आर्या औटेचा जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

अकोले तालुक्यातील वीरगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरित गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनात जामखेड येथील कालिका पोदार लर्न स्कूलच्या आर्या औटेचा सहावी ते आठवी या गटात गणितीय उपकरणात प्रथम क्रमांक पटकावला यामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय घेऊन तालुक्यातील वीरगाव येथील आनंदगड शैक्षणिक संकुलात ५२ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन गुरुवार ते शनिवार तीन दिवस पार पडले. शिक्षणाधिकारी अशोक कडूस (माध्यमिक), भास्कर पाटील (प्राथमिक)व गटविकास अधिकारी अमर माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.

शिक्षण अधिकारी कडूस यांच्या उपस्थितीतच शनिवारी (दि. २५)प्रदर्शनाची सांगता झाली. त्या मध्ये माध्यमिक गटामधून विद्यार्थी आर्या औटे हिने गणित मॉडेल श्रेणीत प्रथम स्थान पटकावले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी आर्याच्या मेहनत, समर्पण आणि गणित विषयीच्या तळमळीचा पुरावा आहे. याहून अधिक प्रभावशाली गोष्ट म्हणजे ती जिल्हा स्तरावरील ५० शाळांमधून सहभागींमध्ये उभी राहिली!

आर्याच्या कर्तृत्वाचा आम्हाला कमालीचा अभिमान वाटतो आणि तिचे मनःपूर्वक अभिनंदन करू इच्छितो! हे यश केवळ तिच्या वैयक्तिक उत्कृष्टतेचेच प्रतिबिंब नाही तर शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देण्याच्या शाळेच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. असे कालिका पोदार लर्न स्कूलच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

तिचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. 26 जानेवारीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन कालिका पोदार स्कूलचे प्राचार्य श्री. प्रशांत जोशी यांनी आर्यास सन्मानचिन्ह व प्रशिस्तपत्र देऊन सन्मानित केले.या प्रसंगी ते म्हणाले कि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असे अनेक सुप्तगुण आहेत .पण गरज आहे ती फक्त शिक्षक रुपी परीसाची एकदा का परिसस्पर्श झाला कि ते सोने चमकल्या खेरीज राहणार नाही. आणि आमच्या स्कूलच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण स्कूल कटिबद्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here