जामखेड मध्ये मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील व आमदार सुरेश धस यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांच्या प्रतिमेची वाल्मीक कराड यांच्या समर्थकांनी विटंबना केली. या प्रकरणाचा सर्व बहुजन समाज्याच्या वतीने आज दि 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता निषेध करण्यात आला. यावेळी मनोज (दादा) जरांगे व सुरेश (अण्णा) धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केली आहे. हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आ. सुरेश (आण्णा) धस, आ. संदीप क्षीरसागर व आ. जितिंद्र आव्हाड यांनी विधीमंडळात तर खासदार बजिरंग सोनवणे यांनी लोकसभेत आवाज उठवला. तसेच बीड, परभणी व धाराशिव या ठिकाणी सर्व पक्षीय मोर्चामध्ये मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी तसेच आ. सुरेश धस, आ. संदीप क्षिरसागर व जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाही मार्गाने रस्त्यावरील लढाई करण्यासाठी व स्व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठविला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया या देखील स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत.
दि.१४ रोजी वाल्मीक कराडवर पोलीस प्रशासनाने खंडणी व मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर परळीतील कराड समर्थक समाज कंठकांनी संघर्ष योद्धा मनोज (दादा) जरागे, आ. सुरेश धस (अण्णा) आ जितंद्र आव्हाड, आ. प्रकाश (दादा) साळुंखे आ. संदिप भैय्या क्षिरसागर यांच्या प्रतिमेची विटंबना केली होती.
याच अनुषंगाने जामखेड येथे बहुजन समाज्याच्या वतीने आज दि 16 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी मनोज (दादा) जरांगे व सुरेश (अण्णा) धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की वाल्मिक कराड हा आरोपी असुन तो गुन्हेगार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना कोणतीही जात नसते. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्यांनी कराडला समर्थन देण्याचे काम केले आहे त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. बीड जिल्ह्य़ातील गुन्हेगारांचे समुळ नष्ट करण्यासाठी व आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रा.मधुकर राळेभात, मंगेश आजबे, गुलाब जांभळे, गणेश डोंगरे, डॉ. भारत देवकर, फिरोज कुरेशी, अवधूत पवार, प्रदिप टाफरे, संभाजी मुळे, भरत जगदाळे, गणेश आजबे, उल्हास माने, सुरज काळे, अंकुश शिंदे, तात्याराम बांदल, वसीम बिल्डर, संतोष गव्हाळे, गोरख घनवट, तात्याराम पोकळे, अशोक घुमरे, पप्पू काशिद, सुनील जगताप, गणेश हागवणे, शाकीर सय्यद, तात्या जरे, भरत राळेभात यांच्या सह मोठ्या प्रमाणावर समर्थक उपस्थित होते.