विजेचा करंट बसून देवदैठण येथील शेतकऱ्याचा मृत्यू

0
1309

जामखेड न्युज——

विजेचा करंट बसून देवदैठण येथील शेतकऱ्याचा मृत्यू

जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील शेतकरी अशोक मनोहर बनकर (आप्पा) वय 61 हे शेतात विजेची मोटार सुरू करण्यासाठी गेले असता पेटीत करंट उतरलेला असल्यामुळे बटन सुरू करताना करंट बसून जागीच मृत्यू झाला यामुळे देवदैठण परिसरात शोककळा पसरली आहे. काल सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

तालुक्यातील देवदैठण येथील शेतकरी अशोक बनकर हे दुपारी आपल्या शेतात गेले असता पिकाला पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. खाली सगळा परिसर ओला झाला होता. बटण सुरू करत असताना पेटीत करंट उतरलेला असल्याने त्यांना करंट बसला खाली सगळा परिसर ओला होता यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शेजाऱ्यांनी ही घटना पाहताच ताबडतोब गावातील सरपंच पोलीस पाटील यांना सांगितले तेव्हा खर्डा पोलीसांना कळविले ताबडतोब खर्डा पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. व मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी देवदैठण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक बनकर यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. मुलांचे शिक्षण सुरू आहेत, मुलगी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत आहे.

अशोक बनकर यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा फायदा मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here