जामखेड करांसाठी बुधवार ठरला घातवार, एकाच दिवशी पाच तरूणांच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळले जामखेड
बुधवार दि. १५ रोजी जांबवाडी शिवारात बोलेरो गाडी विहिरीत पडल्याने चार तरूणांचा मृत्यू झाला तर साकतचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाउपाध्यक्ष हनुमंत पाटील यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले यामुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे. बुधवार हा जामखेड करांसाठी घातवार ठरला आहे.
जामखेड नगरपरिषद हद्दीतील, जांबवाडी जवळील मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज बुधवार दि. १५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण चाकी बोलेरो गाडीने जामखेड कडे येत असताना जांबवाडी शिवारात रस्त्यालगत असलेल्या विहिरीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पन्नास फूट खोल विहिरीत बोलेरो गाडी पडली. मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले. त्यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले.
जामखेड येथील अशोक विठ्ठल शेळके वय 29 रा. जांबवाडी, रामहरी गंगाधर शेळके वय 35 रा. जांबवाडी, किशोर मोहन पवार वय 30 रा. जांबवाडी, चक्रपाणी सुनील बारस्कर वय वय 25 रा. राळेभात वस्ती असे चार तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पवनचक्की कंपनीची ची बोलेरो गाडी एम एच. 23 ए. यु. 8485
साकतचे सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड तालुकाउपाध्यक्ष हनुमंत पाटील वय ४८ याचे ब्रेन हॅमरेजने निधन झाले आज गुरूवारी सकाळी नऊ वाजता साकत येथे मुरूमकर वैकुंठभुमी येथे मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला यावेळी मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, अधिकारी उपस्थित होते.