पाटोद्याचे माजी सभापती यांचा मृतदेह सापडला हत्या कि आत्महत्या याविषयी तर्क वितर्क

0
6059

जामखेड न्युज——

पाटोद्याचे माजी सभापती यांचा मृतदेह सापडला

हत्या कि आत्महत्या याविषयी तर्क वितर्क

 

पाटोद्याचे माजी सभापती गोवर्धन सानप यांचा मृतदेह सौताडा येथे आढळून आला आहे. मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. अखेर आज दुपारी त्यांचा मृतदेह सौताडा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाल्याचे कळते.

गोवर्धन सानप आ. सुरेश धस यांचे कार्यकर्ते होते. काही वर्षांपूर्वी त्यांना पंचायत समितीचे सभापती करण्यात आले होते. मागच्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. सानप यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत.


गोळीबाराच्या चर्चा पण….

गोवर्धन सानप यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या चर्चा होत्या. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी न्युजशी बोलताना मात्र गोवर्धन सानप यांची हत्या झाली नसल्याचे सांगितले असून गोळीबाराच्या अफवा आहेत असे स्पष्ट केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची तपासणी केल्यानंतर खरे कारण समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here