Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या जामखेड महाविद्यालयाच्या रोहित घुगेची बॉक्सिंग मध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड गुरू काशी...

जामखेड महाविद्यालयाच्या रोहित घुगेची बॉक्सिंग मध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड गुरू काशी युनिव्हर्सिटी पंजाब येथे होणार स्पर्धा

0
629

जामखेड न्युज——

जामखेड महाविद्यालयाच्या रोहित घुगेची बॉक्सिंग मध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

गुरू काशी युनिव्हर्सिटी पंजाब येथे होणार स्पर्धा

 

जामखेड महाविद्यालयाचा खेळाडूं रोहित कैलास घुगे यांने आंतर विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक व शादाब राजमोहमद शेख यांने अत्यंत चुरशीने पार पडलेल्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळविले.

महाविद्यालयाच्या रोहित घुगे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बॉक्सिंग या संघात निवड झाली असून डिसेंबर मध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ गुरू काशी युनिव्हर्सिटी पंजाब येथे आयोजित स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या विद्यार्थ्यांस महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.

रोहित घुगे याची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपध्यक्ष अरुण चिंतामणी, संस्थेचे सचिव शशिकांतजी देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डोंगरे एम. एल., तसेच सर्व संचालक मंडळ व सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक यांनी रोहित घुगे चे अभिनंदन करून गुरू काशी युनिव्हर्सिटी पंजाब येथे होणाऱ्या स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!