अक्काच्या हॉटेलमधील शाब्दिक वाद विकोपाला तीन जणांना कोयता व काठीने मारहाण सिसिटिव्हीत घटना कैद
एक दिवसापूर्वी अक्काच्या हॉटेलमध्ये शाब्दिक वाद झाला याचा राग मनात धरून चार जणांनी एका पान शॉपसमोर कोयता व काठीने जबर मारहाण करून जखमी केले. याबाबत जामखेड पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी भारतीय न्याय संहीता १०९, ११८(१), ३५२, ३५१/२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सर्व आरोपी फरार झाले आहेत. ही सर्व घटना सिसिटिव्हीत कैद झाली आहे.
जामखेड पोलिसात किरण चंद्रकांत खेत्रे (वय-२८ वर्ष धंदा-कंट्रक्शन रा.खर्डा रोड, बेल्हेकर वस्ती) यांनी फिर्याद दिली की, दि. 25 रोजी नगर रस्त्यावरील अक्काच्या हॉटेलमध्ये अदनान उर्फ आद्या शेख याच्या बरोबर शाब्दिक वाद झाला होता.
या वादाचा राग मनात धरून दि. 26 रोजी आठ वाजता हिरा मोती पान सेंटर समोर फिर्यादी किरण खेत्रे व त्याचे मित्र महेश येवले व धम्मसागर समुद्र बोलत असताना कुणाल बंडू पवार, अदनान ऊर्फ अदया शेख, सुरज साळुंखे, सुमीत ओहळ (पूर्ण नाव माहीती नाहीत) सर्व रा तपनेश्वर रोड, जामखेड या ठिकाणी कोयता, काठ्या हातात घेवुन आले होते. आरोपी अदनान शेख याने त्याचे हतातील कोयता फिर्यादी किरण खेत्रे या जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात उजव्या बाजुस मारून दुखापत केली.
तसेच आरोपी कुणाल पवार, सुरज साळुंखे व सुमीत ओहळ यांनी त्यांचे हातातील काठीने फिर्यादीस व त्याचे मित्र महेश येवले आणि धम्मसागर समुद्र यांना देखील मारहान करून दुखापत व शिवीगाळ दमदाटी केली. अशी फिर्याद दाखल झाली यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.