जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमीभाव केंद्र सुरू
तालुक्यातील शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राचा लाभ घ्यावा – कृषी उत्पन्न बाजार समिती
शेतकरी हितासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीन हमीभाव केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळावे म्हणून बाजार समिती प्रयत्नशील होती. तसेच उपसभापती कैलास वराट यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत जिल्हा मार्केटिंगने कृषी उत्पन्न बाजार समितीला आयडी दिला आहे. आज हमीभाव केंद्राचे आज उद्घाटन झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी माजी सभापती सुधीर राळेभात, सभापती कार्ले शरद पंडित, उपसभापती वराट कैलास देवराव, घुमरे सचिन नवनाथ, भोंडवे विष्णु शामराव, उतेकर गौतम महादेव, ढवळे अंकुश विठठल, शिंदे सतिष पंढरीनाथ, चव्हाण रतन विठठल, शिंदे अनिता गजानन, जगताप गणेश दादासाहेब, जायभाय नारायण तुकाराम, पाटील वैजीनाथ पोपटराव, ससाणे सिताराम चिमाजी, गोरे नंदकुमार प्रकाश, पवार सुरेश अशोक,बेदमुथ्था राहुल सुरेश, हुलगुंडे रविंद्र शिवराम, सचिव वाहेद सय्यद सह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी बाजार समितीने दोन महिन्यापूर्वी मार्केटिंग फेडरेशनकडे प्रस्ताव देऊन दहा लाख रुपये डिपॉझिट रक्कम भरूनही ते त्यांनी नाकारले होते. मार्केटिंग फेडरेशनने सोमवारी बाजार समिती सचिवाला फोन करून शासकीय हमीभाव खरेदी केंद्र मंजूर झाल्याचे सांगून तातडीने पोर्टलवर नोंद करा तुम्हाला आयडी मिळेल व शेतकऱ्यांच्या नोंदी करा असे कळविण्यात आले त्यामुळे बाजार समितीचे हमीभाव केंद्र मंजूर झाले आहे. आज हमीभाव केंद्राचे उद्घाटन झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जामखेड तालुक्यात यावर्षी वेळेवर पाऊस झाल्या मुळे खरीप हंगामात सोयाबीन, उडीद, मुग उत्पादनात चांगली वाढ झाली. पण बाजारपेठेत दर पडल्याने व शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कनवडीमोल दराने मालाची विक्री करण्याची वेळ आली होती. आता हमीभाव केंद्र सुरू झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाने वातावरण निर्माण झाला आहे.
सरकारने शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मुग 8682, उडीद 7400, सोयाबीन 4892 प्रति क्विंटल असा केला आहे. या दरावर शेतकरी खुश आहे.
चौकट तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हमीभाव केंद्राचा फायदा घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.