राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक रवींद्र भापकर यांची राजस्थान शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड
जामखेड च्या शिरपेचात मानाचा तुरा
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी स्टार प्रकल्पाअंतर्गत विविध राज्यांतील शैक्षणिक बाबींचा अभ्यास करून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडविण्याच्या दृष्टीने राज्यातील अधिकारी,मुख्याध्यापक,शिक्षक व समग्र शिक्षा कर्मचारी यांचा अभ्यास दौरा राजस्थान येथे आयोजित केला आहे.
या दौऱ्यात पुणे विभागातून सरदवाडी ता.जामखेड येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक श्री रवींद्र भापकर यांची निवड झाली आहे. श्री रवींद्र भापकर यांना यापूर्वी भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले असून सध्या ते बालभारती पाठ्ठ्यपुस्तक मंडळाच्या इतिहास विषय समिती सदस्य, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या थिंक टँक गटाचे सदस्य ,CIET NCERT चे नॅशनल रिसोर्स पर्सन तसेच सायबर स्पेस इंडिया चे नॅशनल ज्युरी मेंबर अशा अनेक पदांवर कार्यरत आहेत.
हा दौरा दिनांक 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान आयोजित केला असून या दरम्यान शिक्षण उपसंचालक श्री संजय डोर्लीकर व सहाय्यक संचालक श्रीमती सरोज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र टीम राजस्थान मधील विविध शासकीय शाळा, राज्य SCERT, डायट तसेच विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देवून अभ्यास करणार आहेत.
श्री भापकर यांची या दौऱ्यात निवड झाल्याबद्दल शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री कैलास खैरे, विस्तार अधिकारी जालिंदर खताळ,केंद्रप्रमुख नवनाथ बडे सह अधिकारी, मित्रमंडळी व नातेवाईक आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे .