फडणवीस यांच्या गृहमंत्री काळात एकही आंदोलन हाताळता आले नाही. निरपराध आंदोलकांवर फडणवीस यांनी लाठीहल्ले केले, आंतरवाली सराटी मराठा आंदोलकांवर, बार्सो रिफायनरी आंदोलकांवर, देहू आळंदी वारकऱ्यांवर हल्ला बदलापूर घटना यातील एकही आंदोलन फडणवीस यांना हाताळता आलेले नाही ते नापास गृहमंत्री आहेत अशी टिका शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
२२७ कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी जामखेड तालुक्यातील नान्नज येथे जाहीर प्रचार सभेचे आयोजन केले आहे यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी असा उल्लेख केला. भाजपाने नेते घडविले नाहीत तर दुसऱ्या पार्टीचे नेते चोरले आहेत. आतापर्यंत भाजपा सरकारला लाडकी बहिण का आठवली नाही. निवडणूक समोर ठेवून आणलेली योजना आहे. पण राज्यात बहिण सुरक्षित नाही. भाजपा सरकार म्हणजे गुंडाचे, दलालांचे, एजंटांचे, बदमाशाचे सरकार आहे.
पाशाभाई पटेल आमदार प्रा राम शिंदे यांना पाडण्यासाठीच आले होते.
भाजपाचे नेते पाशाभाई पटेल यांची जामखेड येथे आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली या सभेत महिलांविषयी अर्वाच्य भाषेत अश्लिल हावभाव करत बोलले तेव्हा पोलीसांनी एक साधा हजार रुपये दंड असणारा गुन्हा दाखल केला म्हणजे दंड भरा व काहीही बोला काहीही करा असे हे करत आहेत. एरवी किरकोळ घटना झाली तरी भाजपाच्या महिला आघाडी आगपाखड करतात पाशाभाई पटेल बोलले तेव्हा कुठे होती भाजपा महिला आघाडी नक्कीच राम शिंदे व पाशाभाई पटेल यांची काहीतरी वैर असावे त्यांना पराभूत करण्यासाठीच पाशाभाई पटेल आले होते असे वाटते.
चांगले काम केल्यावर जाहिरात करायची आवश्यकता भासत नाही भाजपा सरकारच्या काळात शेतीमालाला भाव नाही. जाती जातीत विष कालव्याचे काम फडणवीस करतात कारण ते विकासावर बोलू शकत नाहीत म्हणून खोट्या जाहिराती करत आहेत. मराठा, धनगर, अदिवासी समाजाला फसवणारे फडणवीस आहेत.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, सध्या मतदारसंघात खुपच चुकीच्या गोष्टी घडत आहेत मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी सुरू आहे. दमदाटी करून प्रवेश केले जात आहेत. ती आपण मोडित काढणारच तसेच पुढील पाच वर्षांत शेतीसाठी पाणी व बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी एमआयडीसी आणणारच असेही सांगितले.
पंकजा मुंडे धाडसी नेत्या – रोहित पवार भाजपाचे कटेंगे तो बटेंगे या विधानावर भाजपा नेत्या एकमेव आहेत त्या बोलल्या तसेच फडणवीस म्हणजे फसवणीस आहेत. मराठा, धनगर, अदिवासी समाजाला फसवणारे फडणवीस आहेत. माझी लढाई राम शिंदे बरोबर नाही तर देवेंद्र फडणवीस बरोबर आहे असे रोहित पवार यांनी सांगितले.
चौकट जवळा जिल्हा परिषद गटात माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना मोठा धक्का. १९९३ सालापासूनचे जुने मित्र व शिवसेना जवळा जिल्हा परिषद गटाचे प्रमुख मा. इंजी.संतोष हजारे यांचा कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष मा. नामदेव देवा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला.