कर्जत जामखेड चे भविष्य बदलविण्याची ताकद आमदार प्रा राम शिंदे यांच्या मध्येच – नितीन गडकरी
2019 चे नाणे 2024 ला चालणार नाही – आमदार प्रा राम शिंदे
जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी हि निवडणूक आहे. या परिसरात पाण्याची मोठी समस्या आहे. समस्या सोडविण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस आमदार प्रा राम शिंदे हेच आहेत असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
२२७ कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, संविधान कोणीही बलणार नाही काँग्रेस सरकारने संविधानात मोठ्या प्रमाणात छेडछाड केली आहे.
काँग्रेस सरकारने शेती, सिंचन, ग्रामीण रस्ते याकडे लक्ष दिले नाही. यामुळे ग्रामीण भागातील लोक शहरात निघून गेले शहरे वाढली ग्रामीण भाग ओस पडत गेला सध्या आपण यावर लक्ष केंद्रित केले आहे. गरीबी भुकमारी कमी करण्यासाठी पाण्याचे डिपाँजीट करणे आवश्यक आहे. सुरत चेन्नई 80 हजार कोटी रुपयांचा रस्त्यामुळे 1600 किलोमीटर चे अंतर 1290 किलोमीटर होणार आहे.
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, पाच वर्षांत फक्त इव्हेंट झाले विकास झाला नाही. विकासाची नौटंकी झाली मागील निवडणुकीत घराण्याच्या नावावर खोटे आश्वासने देऊन मतदारसंघाची दिशाभूल केली. यावेळी नौटंकी चालणार नाही.
तुकाई चारी बंद करण्याचे पाप विद्यमान आमदाराचेच आहे. तुकाई चारी मुळे 22 गावे 27 तलावात पाणी येणार आहे. जलयुक्त च्या कामामुळे तालुका दुष्काळ मुक्त झाला आहे. 2019 चे नाणे 2024 ला चालणार नाही आता हिशोब देण्याची वेळ आली आहे.
गडकरी साहेबांनी 2592 कोटी रुपयांचा निधी दिला आहे सगळी प्रक्रिया आपल्या काळात झालेली आहे. सध्या मतदारसंघात आपल्या कामाचे श्रेय घेण्याचा धंदा सुरू आहे