रोहित याने पाच वर्षांत कर्जत जामखेड मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून तुमचा घरचा प्रतिनिधी म्हणून खुप चागले काम केले आहे. शेतीचे पाणी आणी एमआयडीसी तुमच्या आमदाराला आता मंत्री करण्यासाठी भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केले.
227 कर्जत जामखेड मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ कर्जत येथे शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी महाविकास आघाडीचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहेत. मुली गायब होणे, पळवून नेणे हे प्रकार वाढले आहेत ही शरमेची गोष्ट आहे. महाराष्ट्रात मुलींना मोफत शिक्षण दिले पण मुली सुरक्षित नाहीत. शिकून नोकरी नाही. यामुळे बेकारी वाढली आहे. यातून आत्महत्या वाढल्या आहेत.
समोरचा उमेदवार दहा वर्षे आमदार यातील पाच वर्षे मंत्री होता काय दिवे लावले. मतदारसंघातील प्रश्न तो सोडवू शकला नाही. रोहितने पाच वर्षांत चांगले काम केले आहे आता राहिलेले प्रश्न सोडविण्यासाठी रोहितला मंत्री करण्यात येईल व शेतीला पाणी व एमआयडीसी चा प्रश्न सोडविला जाईल.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, आपले सरकार आल्यावर आपण महालक्ष्मी योजना आणणार आहेत प्रत्येक बहिणीला तीन हजार रुपये मिळणार आहेत तसेच शेतीमालाला भाव, दुधाला भाव देणार आहोत.
यावेळी भाजपा शिवसेना यातील काही पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. तसेच आज जामखेड येथे विंचरणा नदी काठावरील शंकराच्या मुर्तीपासून आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत शहरात पदयात्रा निघणार आहे.