जामखेड न्युज——
शहरातील प्रतिष्ठित तरूण निघाला शेळ्या चोर
जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जामखेड शहरातील प्रतिष्ठित म्हणून समजला जाणारा तरूण शेळ्या चोर प्रकरणात पकडला गेला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
जामखेड तालुक्यातील भुतवडा येथील छाया दादा डोके वय 60 धंदा शेती यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भुतवडा शिवारात आरोपी पंडित सिताराम पवार वय 45,सुदेश बाळासाहेब कोळपकर वय 19, गणेश जाधव वय 18 रा. सर्व तपनेश्वर या तिघांनी स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी सहा शेळ्यांचे लहान मोठे सहा करडे गाडीवर चोरून चालले होते.
गाडीवर सहा करडे घेऊन जात असताना शेजारी गुरे चारत असलेल्या नागरिकांनी पाहिले व ताबडतोब मित्रमंडळी व गावातील तरूणांना फोन करून बोलून घेतले त्यावेळी जमलेल्या तरूणांनी शेळ्या चोराला चांगलाच चोप दिला.
पंधरा दिवसांपुर्वी शेळी पण गायब झाली होती. पण शेळी मालकाला वाटले की, लांडगा किंवा बिबट्या ने खाल्ली असावी पण आज समजले की, शेळी पण चोरट्यांने चोरलेली असावी अशी खात्री पटली सहा करडे अठरा हजार रुपये किंमतीचे असा मुद्देमाल नागरिकांनी पकडला रात्री उशिरा पर्यंत करडे पोलीस स्टेशनला आणलेले होते रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जे ए सरोदे करत आहेत.