Friday, October 23, 2026
Home प्रादेशिक बातम्या विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची पदकांची लयलूट! गौरव रासणेला रौप्य, रुपेश आणि...

विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची पदकांची लयलूट! गौरव रासणेला रौप्य, रुपेश आणि उपेश धनलगडेंना कांस्यपदक २० किलोमीटर चालणे, गोळाफेक आणि थाळीफेकमध्ये खेळाडूंची चमकदार कामगिरी, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा!

0
2
विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची पदकांची लयलूट! गौरव रासणेला रौप्य, रुपेश आणि उपेश धनलगडेंना कांस्यपदक  २० किलोमीटर चालणे, गोळाफेक आणि थाळीफेकमध्ये खेळाडूंची चमकदार कामगिरी, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा!

जामखेड न्युज – – – – – 

विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची पदकांची लयलूट! गौरव रासणेला रौप्य, रुपेश आणि उपेश धनलगडेंना कांस्यपदक

२० किलोमीटर चालणे, गोळाफेक आणि थाळीफेकमध्ये खेळाडूंची चमकदार कामगिरी, महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाचा तुरा!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय मैदानी स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तीन पदकांची कमाई केली आहे. गौरव दत्ता रासणे याने २० किलोमीटर चालणे स्पर्धेत रौप्यपदक पटकावले, तर रुपेश धनलगडे याने गोळाफेक आणि उपेश धनलगडे याने थाळीफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशामुळे जामखेड महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत खाशाबा जाधव क्रीडा संकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंतरविभागीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले.

या स्पर्धेत गौरव दत्ता रासणे याने २० किलोमीटर चालणे या क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकावून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली. तसेच रुपेश धनलगडे याने गोळाफेक स्पर्धेत कांस्यपदक, तर उपेश धनलगडे याने थाळीफेक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून आपापल्या क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. या तिन्ही खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती अधोरेखित झाली आहे.

मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून गौरव
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा पदक प्रदान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी प्रा. डॉ. सुदाम शेळके (सहाय्यक क्रीडा संचालक), विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शिवाजी उत्तेकर, डॉ. रमेश गायकवाड, डॉ. सतीश चोरमले, डॉ. राजेंद्र देवकाते, डॉ. विजय म्हस्के, डॉ. रवी काळाणे यांच्यासह विद्यापीठ मंडळाचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पदक प्रदान करून खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संपादन केलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. उद्धवबापू देशमुख, उपाध्यक्ष श्री. दिलीपशेठ गुगळे, सचिव श्री. अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार श्री. शरदकाका देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेशजी मोरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम डी. केळकर, उपप्राचार्य प्रा. सुनील वाय. नरके, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख प्रा. डॉ. आण्णा मोहिते यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले.

खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवी उभारी मिळाली असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धा आणि आश्वमेध स्पर्धांमध्येही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर जामखेड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विद्यापीठाच्या मैदानी स्पर्धेत आपली छाप उमटवली असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!