Friday, October 23, 2026
Home ताज्या बातम्या भ्रष्टाचाराविरोधात आता नागरिकांनीही पुढाकार घ्यावा! २६ ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताह, लाच मागितल्यास...

भ्रष्टाचाराविरोधात आता नागरिकांनीही पुढाकार घ्यावा! २६ ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताह, लाच मागितल्यास थेट १०६४ वर तक्रार करा!

0
2
भ्रष्टाचाराविरोधात आता नागरिकांनीही पुढाकार घ्यावा! २६ ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताह, लाच मागितल्यास थेट १०६४ वर तक्रार करा!

जामखेड न्युज – – – – – 

भ्रष्टाचाराविरोधात आता नागरिकांनीही पुढाकार घ्यावा! २६ ऑक्टोबरपासून दक्षता जनजागृती सप्ताह, लाच मागितल्यास थेट १०६४ वर तक्रार करा!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणार, अहिल्यानगर एसीबी विभाग २४ तास कार्यरत

भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, सरकारी कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असेल किंवा सरकारी अधिकारी-कर्मचारी भ्रष्टाचारात गुंतले असल्याची माहिती असेल, तर नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या घोषणेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत असून, भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती करणे, नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेची भावना वाढविणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
शासकीय कार्यालयात विविध कामांसाठी नागरिकांना अनेकदा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. अशा वेळी एखाद्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास संबंधित नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचारात गुंतले असल्याची माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरोधात तक्रार असल्यास नागरिकांनी संबंधित विभागाकडे माहिती द्यावी. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविल्यास अशा गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होऊ शकते.

तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवणार
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर हा विभाग २४ तास कार्यरत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासंबंधी माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दबावाला किंवा भीतीला बळी न पडता भ्रष्टाचाराविरोधात पुढे यावे आणि प्रामाणिक प्रशासनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.
तक्रार करण्यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, परिक्षेत्र कार्यालय, अहिल्यानगर
टोल फ्री क्रमांक : १०६४
दूरध्वनी : ०२४१-२४२३६७७
व्हॉट्सॲप क्रमांक : ९९३०९९७७०० / ९१६८६४१०६४
ई-मेल : dyspacba.nagar@gmail.com
ई-मेल : dyspacbahamadnager@mahapolice.gov.in

कार्यालयाचा पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुख्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टीव्ही सेंटरसमोर, सावेडी, अहिल्यानगर.
संपर्क अधिकारी : श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर.
भ्रष्टाचारमुक्त समाजासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
भ्रष्टाचार ही केवळ प्रशासनाची समस्या नसून, त्याविरोधात समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक आहे.

दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
‘लाच देऊ नका, लाच घेऊ नका आणि लाचेची मागणी झाल्यास तक्रार करा,’ या भूमिकेतून नागरिकांनी भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!