जामखेड न्युज——
इंदिरा इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी ला डी फार्मसीची मान्यता
2024-2025 साठी D.Pharmacy साठी प्रवेश सुरु
जामखेड पासून अवघ्या 7 किलोमीटर वर असणाऱ्या साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणच्या चेतना सेवा संस्था संचलित इंदिरा कॉलेजला आता डी फार्मसीला शासकीय मान्यता मिळाली आहे.
संचालक तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांनी मान्यता देऊन कॉलेजला ऍडमिशन साठी कॉलेज कोड दिला आहे कॉलेज कोड–05656 या सांकेतिक कोडवर जाऊन आपण शासकीय नियमानुसार प्रवेश घेऊ शकतात.
त्यामुळे जामखेड तालुक्यासह करमाळा, पाटोदा आष्टी,शिरूर, कर्जत, भूम परांडा सह अनेक शहरांना व महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
आजपासून कॉलेजला प्रवेश ऑनलाईन सुरु झाले आहेत तेव्हा सर्व विध्यार्थ्यानी आपला प्रवेश कॉलेजवर जाऊन निश्चित करावा.
सर्व फी शासकीय नियमानुसार घेतली जाईल. शिष्यवृत्ती ची सोय, सुसज्ज लॅब,प्रशास्त इमारत, निसर्गरम्य परिसरात, अनुभवी व तज्ञ् प्राध्यापक वर्ग,येण्या-जाण्यासाठी बसची सोय, शासकीय वसतिगृह, मुलींसाठी हॉस्टेलची सोय व इतर सर्व सुविधा उपलब्ध असतील.
या कॉलेजचा फायदा हा ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना होईल आपल्या भागातील ज्या विध्यार्थ्यांची परिस्थिती पुणे नगर ला शिक्षण घेण्याची नाही त्यानाचा वेळ आणि जास्तीचा पैसा वाचून डिग्री मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी आजच आपला प्रवेश निश्चित करा आहे आवाहन कॉलेजच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सूर्यवंशी यांनी केले आहे.