जामखेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

 

खर्डा येथील फिर्यादीच्या घरासमोरील रोडच्या टाकीजवळ आरोपीने अल्पवयीन मुलीस धमकी देऊन तिच्यासोबत अंधारामध्ये बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, खर्डा येथील १४ वर्षे ७ महीने आसलेल्या अल्पवयीन मुलीवर आरोपी सचिन दिलीप काळे वय १९ वर्ष, रा .खर्डा. याने दि ७ ऑक्टोबर रोजी दुपारी अत्याचार केला आहे. खर्डा येथील फिर्यादीच्या घरासमोरील रोडच्या शेजारील टाकीजवळ आरोपी सचिन काळे याने पिडीत मुलीस धमकी देऊन तिला अंधारामध्ये घेऊन जाऊन बळजबरीने अत्याचार केला.

तसेच यापूर्वी आरोपी याने धाक दाखवून ऑगस्ट २०२४ मध्ये घरासमोरील टाकीजवळ बळजबरीने अत्याचार केला होता. याबाबत अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्यामुळे खर्डा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची फिर्याद सदर अल्पवयीन पीडित मुलीचे नातेवाईक रा. खर्डा, तालुका जामखेड यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिली आहे.

या संदर्भात तपासाची चक्रे फिरवून खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपी सचिन काळे रा खर्डा, ता. जामखेड यास २४ तासाच्या आत अटक केली असून,

त्याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करीत आहेत.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!