जामखेड न्युज——
पश्चिम विभागीय थाळीफेक स्पर्धेत सिद्धी रासकर ला सिल्व्हर पदक
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थ्यीनी सिद्धी अर्जुन रासकरने 3 ते 4 ऑक्टोंबर 2024 नागपूर येथे झालेल्या ॲथलेटिक्स फेडरेेशन ऑफ इंडियाच्या वेस्ट झोन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत सिल्व्हर पदक मिळवले यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिनांक 3 ते 4 ऑक्टोंबर 2024 नागपूर येथे झालेल्या ॲथलेटिक्स फेडरेेशन ऑफ इंडियाच्या वेस्ट झोन स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामखेड ची खेळाडू कुमारी सिद्धी अर्जुन रासकर हिने थाळीफेक या प्रकारात द्वितीय क्रमांक सिल्वर मेडल मिळविले यामुळे तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिच्या यशाबद्दल दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेश मोरे तसेच तसेच सर्व संचालक मंडळ
तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक रमेश चौधरी, पर्यवेक्षक पी. टी.गायकवाड, क्रीडा शिक्षक राघवेंद्र धनलगडे, बंटी पाटील, प्रल्हाद साळुंखे सह सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
मागील महिन्यातही पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन च्या राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेतही सिद्धी रासकरने द्वितीय क्रमांक पटकावला होता.