जामखेड न्युज——
जामखेड ची शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीबरोबरच – शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उगले
जामखेड नगरपरिषद जवळील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ‘हम पाच-पाच है.. ‘, कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती आमदार रोहित पवार यांच्या विरोधात पाच पक्ष आहेत असे कोणीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला होता. कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे. जामखेड तालुक्यातील शिवसेना (उबाठा) ही महाविकास आघाडीबरोबरच म्हणजे आमदार रोहित पवार बरोबरच आहे. यात कोणीही कसलीही शंका घेऊ नये असे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश उगले यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
आमदार रोहित पवार यांनी विकास कामांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदललेला आहे. रस्ते, आरोग्य, जलजीवन या क्षेत्रात भरीव काम तर महिला, शालेय विद्यार्थी यांंच्या साठी भरीव योगदान दिले आहे. शासकीय इमारती,निवासस्थाने, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप क्रिकेट स्टेडियम भूमीपूजन असे भरीव कामे केलेली आहेत.
आमदार रोहित पवार विरोधात कोणीच उमेदवार नाही जनता सर्व रोहित पवार बरोबर तर अनेक नेते विरोधात आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असा खोडसाळपणा केलेला आहे. यात काहीही तथ्य नाही आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी महाविकास आघाडीबरोबरच म्हणजे रोहित पवार बरोबरच आहोत असे उगले यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धती वर नाराज होऊन अनेक कर्जत जामखेड तालुक्यातील नेत्यांनी त्यांना सोडून भाजपामध्ये तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. नेते बरोबर नसले तरी जनता मात्र रोहित पवार बरोबरच आहे. महाविकास आघाडीबरोबरच संपूर्ण तालुक्यातील शिवसेना आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केलेला आहे. यात काहीही तथ्य नाही.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर लोकसभेत भाजपाला दारूण पराभव पत्करावा लागला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून हा पराभव पत्करावा लागला होता दक्षिण अहमदनगर लोकसभेत येणाऱ्या कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात अनोखे बॅंनर्स लागल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनर्सवर हम साथ साथ हैं हम पाच पाच है असा आशय दिसतोय. महायुतीच्या चिन्हासोबत ठाकरे गटाची मशाल आणि काँग्रेसच्या पंजाचा पण फोटो दिसतोय. लावलेल्या बॅनर्समुळे कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात लागलेल्या या निनावी बॅनरमुळे मतदारसंघात चर्चा सुरू आहे. या चर्चेत काहीही तथ्य नाही जामखेड तालुक्यातील शिवसेना रोहित पवार बरोबरच ठाम आहे असे तालुकाप्रमुख गणेश उगले यांनी सांगितले.