जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना व गणित विज्ञान संघटनेच्या वतीने डॉ. पल्लवी वायकरचा सत्कार

0
327

जामखेड न्युज——

जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना व गणित विज्ञान संघटनेच्या वतीने डॉ. पल्लवी वायकरचा सत्कार

डॉ पल्लवी वायकर यांची सहाय्यक आयुक्त विक्रीकर पदी निवड झाल्याबद्दल जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघटना, गणित विज्ञान संघटना यांच्या वतीने घरी जाऊन सत्कार करण्यात आला

यावेळी श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रमेश अडसुळ, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी गायकवाड, गणित विज्ञान संघटनेचे भरत लहाने, भाऊसाहेब इथापे, बाजीराव गर्जे, डॉ. पल्लवी वायकरचे वडील शहाजी वायकर, सुर्यकांत कदम, बबन राठोड, नाना शिंदे, अनिल देडे, शिवाजी गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जामखेड येथील सेवानिवृत्त शिक्षक शहाजी वायकर सर यांची मुलगी डॉक्टर पल्लवी वायकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 परीक्षेत क्लासवन पदी सहाय्यक आयुक्त विक्रीकर म्हणून निवड झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ती मुलींमधे ओबीसी प्रवर्गात दुसरी तर ओपन प्रवर्गात राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे.

तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जामखेड मध्ये आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले.

तिच्या यशाबद्दल माध्यमिक शिक्षक संघटना व गणित विज्ञान संघटनेच्या वतीने डॉ. कु .पल्लवी वायकर यांची राज्य कर सहाय्यक आयुक्त  म्हणून निवड झाल्याबद्दल फेटा बांधून , शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.


 
           या वेळी डॉ.पल्लवी वायकर यांनी आपले शालेय शिक्षण व आपले शालेय अनुभव कथन केले. स्पर्धा परीक्षा तयारी करताना सातत्य, परिश्रम, वेळेचे नियोजन याबद्दल अभ्यास करणाऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले


        

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here