कर्जत जामखेड च्या भुमीत महान क्रिकेट खेळाडू तयार होतील – रोहित शर्मा जामखेड मध्ये ही लवकरच स्टेडियम – रोहित पवार

0
1513

जामखेड न्युज——

कर्जत जामखेड च्या भुमीत महान क्रिकेट खेळाडू तयार होतील – रोहित शर्मा

जामखेड मध्ये ही लवकरच स्टेडियम – रोहित पवार

 

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल मधुन उद्याचे यशस्वी जयस्वाल, शुभमन गील, बुमराह, मोहम्मद शिराज यासारखे महान क्रिकेट खेळाडू याच भूमीतून तयार होतील. मला परत कर्जत जामखेड मध्ये येण्यासाठी आवडेल. कर्जत जामखेड चे वजन आता महाराष्ट्रात वाढले आहे असे मत महान क्रिकेट खेळाडू रोहित शर्मा यांनी व्यक्त केले.

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघात राशीन येथे क्रिकेटर रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन आज दि. ३ रोजी करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, मी स्वतः रोहित शर्मा चा फॅन आहे, त्यांच्या अकॅडमीच्या मदतीने ग्रामीण भागतील खेळाडूंना व्यासपीठ मिळत आहे, रोहित शर्मा यांनी मोठं मन दाखवून त्यांची क्रीक किंग्डम अकॅडमी सुरू करत आहेत. ग्रामीण भागतील रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडमी आहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

 

येथील अकॅडमीत होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. क्रिकेट, कुस्ती आणि उरेलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघ आणि अहमदनगर जिल्ह्यातील मुलांना याचा फायदा होईल, असेही पवार यांनी म्हटले. दरम्यान, राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार आहे, तर कर्जत जामखेड स्टेडियमला तेथील लोकांना विचारून नाव देण्याचं ठरविण्यात येईल, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

 

राशीन प्रमाणे कर्जत व जामखेड मध्ये ही रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर शाळा, स्टेडियम व स्पोर्ट्स काँम्प्लेक्स बांधून दान करण्यात येणार आहे.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आणि वर्ल्ड कप विजेता रोहित शर्मा, मनोरंजनाचा तडका म्हणून प्रसिद्ध DJ Kretecs, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत, आणि श्रावणी महाजन यांचा मधुर आवाज सोहळ्याला रंगत आणली होती. रोहित शर्मा यांचे मोठ्या उत्साहात व टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले यावेळी आवाज कसा वाटतोय असे विचारले असता रोहित शर्मा म्हणाले स्टेडियम पेक्षा मोठा वाटत आहे.

कर्जत आणि जामखेड येथील स्टेडियम भूमीपूजन साठी रोहित शर्मा यांना आमंत्रण देण्यात आले यावेळी त्यांनी सांगितले की, माझे क्रिकेट सामने नियोजन नसेल तर क्कीच येईल.

चौकट

जनतेची काळजी घेणारे जनतेचे हितमँन रोहित पवार तर क्रिकेट मधील हिटमँन रोहित शर्मा 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here