जामखेड न्युज——
डॉ पल्लवी वायकर यांची सहाय्यक आयुक्त विक्रीकर पदी निवडीबद्दल जामखेडमध्ये विविध ठिकाणी सत्कार
जामखेड येथील सेवानिवृत्त शिक्षक शहाजी वायकर सर यांची मुलगी डॉक्टर पल्लवी वायकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 परीक्षेत क्लासवन पदी सहाय्यक आयुक्त विक्रीकर म्हणून निवड झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ती मुलींमधे ओबीसी प्रवर्गात दुसरी तर ओपन प्रवर्गात राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जामखेड मध्ये आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजी करत भव्य स्वागत करण्यात आले.
तिच्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड येथे डॉ. कु .पल्लवी वायकर यांची राज्य कर सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल फेटा बांधून , शाल व बुके देऊन शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी डॉ.पल्लवी वायकर यांनी आपले शालेय शिक्षण व आपले शालेय अनुभव कथन केले. स्पर्धा परीक्षा तयारी करताना सातत्य, परिश्रम, वेळेचे नियोजन याबद्दल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना सखोल मार्गदर्शन केले.स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्याचा कानमंत्र विद्यार्थ्याना दिला.यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्र जामखेड मध्ये मिळत असलेले शांत व प्रसन्न वातावरणातील अभ्यासिका वर्तमानपत्रे, मासिके, नोट्स, स्पर्धा परीक्षा पुस्तके आणि मार्गदर्शन या सुविधा बद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते शिवाजीराव ढाळे यांनी मातृभाषेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.जामखेड तालुक्यातून वर्ग १ चा अधिकारी होणे ही गोष्ट समाधान देणारी आहे असे मत व्यक्त केले.
प्रमूख पाहुणे श्री दिलीप ढवळे यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगून अभ्यासिकेतील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे या बद्दल आनंद व्यक्त केला.
डॉ. पल्लवी वायकर यांचे वडील निवृत्त शिक्षक शहाजी वायकर यांनी आपल्या मुलीने जास्ती जास्त वेळ स्पर्धा परीक्षा तयारी साठी दिला असून कमीत कमी मोबाईलचा वापर केला असे सांगितलेज्ञ
यावेळी श्री नागेश विद्यालय जामखेड मधिल प्रा कैलास वायकर सर,श्री मयुर भोसले सर व स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतिल विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संचालक श्री शिंदे बी.एस.यांनी केले. सूत्रसंचालन आजिनाथ हळनोर यांनी पार पाडले उपस्थित सर्वांचे आभार वाळूंजकर वैष्णवी यांनी मानले.