जामखेड न्युज——
कर्जत जामखेड मतदारसंघात हम पाच-पाच है बॅनरची चर्चा
जामखेड शहरात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लागलेले असतात, अनेक वेळा बॅनर वरून संघर्ष व मारामाऱ्या व वादंग मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. जामखेड बंद पर्यंत घटना घडल्या आहेत. वाढदिवस, वेगवेगळे राजकीय कार्यक्रम याचे मोठ्या प्रमाणात बॅनर लागलेले असतात. नुकताच नगरपरिषद जवळील एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ‘हम पाच-पाच है.. ‘, कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
हा बॅनर कोणी लावला, का लावला दोन दिवसात परत का काढून घेतला याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र जोरदार चर्चा रंगली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धती वर नाराज होऊन अनेक कर्जत जामखेड तालुक्यातील नेत्यांनी त्यांना सोडून भाजपामध्ये तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला पाच वर्षांत मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना यांचे आमदार रोहित पवार बरोबर पटलेच नाही. यामुळे सत्ताधारी तीन पक्ष व आता काँग्रेस व शिवसेना असे पाच रोहित पवार विरोधात आहेत अशीच चर्चा सध्या सगळीकडे आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर लोकसभेत भाजपाला दारूण पराभव पत्करावा लागला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून हा पराभव पत्करावा लागला.
दक्षिण अहमदनगर लोकसभेत येणाऱ्या कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे.
अशातच आता कर्जत जामखेड मतदारसंघात अनोखे बॅंनर्स लागल्याचे पाहायला मिळत आहे. या बॅनर्सवर हम साथ साथ हैं हम पाच पाच है असा आशय दिसतोय. महायुतीच्या चिन्हासोबत ठाकरे गटाची मशाल आणि काँग्रेसच्या पंजाचा पण फोटो दिसतोय. लावलेल्या बॅनर्समुळे कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघात लागलेल्या या निनावी बॅनरमुळे मतदारसंघात चर्चा सुरू आहे.