क्रिकेट मधील हिटमँन राजकारणातील हिटमंँनच्या मतदारसंघात श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन

0
229

जामखेड न्युज——-

क्रिकेट मधील हिटमँन राजकारणातील हिटमंँनच्या मतदारसंघात

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन

 

आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघात राशीन येथे नवरात्रीत ऐतिहासिक सोहळा, क्रिकेटर रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

आमदार रोहित पवार माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पावन पर्वावर राशीन येथे एक ऐतिहासिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

ज्यामुळे क्रीडा आणि मनोरंजनाचा जल्लोष होणार आहे. श्री जगदंबा देवी मातेच्या पवित्र भूमीत, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम राशीन येथे गुरुवारी ( दि. ३ ऑक्टोबर २०२४) ला सकाळी ११ वाजता होणार आहे.

 

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार आणि वर्ल्ड कप विजेता रोहित शर्मा, जो या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सोहळा खास आकर्षण ठरणार आहे.

याचबरोबर मनोरंजनाचा तडका म्हणून प्रसिद्ध DJ Kretecs, सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत, आणि श्रावणी महाजन यांचा मधुर आवाज सोहळ्याला रंगत आणणार आहे.

हा सोहळा क्रीडा आणि मनोरंजनाच्या चाहत्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार असून या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

तरी सर्व भाविक भक्तांनी, क्रिकेट रसिकांनी, मतदारसंघांतील नागरिकांनी या ऐतहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here