जामखेड न्युज ——
रोहित च्या विकास कामात खोडा घालू नका, विकास कामे उभे करण्यासाठी अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
विकास कामे उभं करायला अक्कल लागते. पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार चांगले काम करत आहे. त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली. जामखेड तालुक्यातील खर्डा, इथे शरद पवार बोलत होते.
यावेळी भुषणसिंग होळकर, खासदार निलेश लंके, माजी आमदार साहेबराव दरेकर, राहुल मोटे यांच्या सह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळजी करु नका 2 महिन्यात चित्र बदलणार
कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी असले पाहिजे हाच विचार करुन रोहित पवारांनी दोन तालुक्याच्यामध्ये एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केल्याचे रोहित पवार म्हणाले. पण त्या एमआयडीसीला अडथळा आणण्याचे काम झाले. मी रोहितला सांगितले की, काळजी करु नको दोन महिन्याने चित्र बदलणार असल्याचे शरद पवार म्हणाले. 2 महिन्यात राज्याचे चित्र बदलेले की राज्यातील सर्व जिल्हे विकासाकडे वाटचाल करतील.
हे काम करण्यासाठी मला तरुणांची साथ हवी आहे. ही ताकद कुणात असेल तर ती रोहित पवारांमध्ये आहे. त्यामुळं तुमची साथ रोहित पवारांना द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं. साडेचार वर्षात मतदारसंघात राष्ट्रीय, राज्य व ग्रामीण भागातील रस्त्यासाठी 2700 कोटी, जलजीवन पाणीपुरवठा साठी 300 कोटी, जामखेड पाणीपुरवठा 180 कोटी अशी अनेक कामे रोहित पवार यांनी मंजूर करून आणली. विकासाचे व्हिजन असलेला नेता रोहित आहे. मतदारसंघाची एक वेगळी ओळख रोहित ने निर्माण केली आहे.
एमआयडीसीला जुन्या लोकप्रतिनिधीकडून विरोध अडचणी आणण्याचे काम सुरु
कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये एमआयडीसी होतेय म्हटल्यावर जुन्या लोकप्रतिनिधीला आनंद व्हायला हवा होता. कारण यामुळं अनेक लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. पण एमआयडीसी होतेय म्हटल्यावर त्याला विरोध करणे, अडचणी आण्याचे काम सुरु असल्याचे शरद पवार म्हणाले. रोहित पवारांच्या प्रयत्नामध्ये अनेकांनी अडथळे आणण्याचे काम केल्याचे शरद पवार म्हणाले. दोन महिन्यांनी राज्यातील चित्र बदलणार आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असल्याचे शरद पवार म्हणाले.