जामखेड न्युज———
रोहित पवारांच्या मंत्रीपदाचे शरद पवारांकडून संकेत
रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवत वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाच वर्षे तुमची सेवा केली आता महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी रोहित ला देऊ कारण महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. असे मत शरद पवार यांनी खर्डा येथील कार्यक्रमात केले.
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एकूण 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न देशाचे माजी कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. खा. श्री. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज मा. श्री. युवराज भूषणसिंहराजे होळकर, अहिल्यानगरचे मा. खा. श्री निलेश लंके, माजी आमदार साहेबराव दरेकर, राहुल मोटे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, सुधीर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, संजय वराट, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी सभापती सुर्यकांत मोरे, वैजनाथ पोले, हनुमंत पाटील, सागर कोल्हे, बापुसाहेब कार्ले, प्रशांत राळेभात, काका कोल्हे यांच्या सह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, विकास कामे उभं करायला अक्कल लागते. पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही. रोहित पवार चांगले काम करत आहे. त्याला मदत करता आली नाही तर त्याच्या कामात खोडा घालू नका असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली.
काळजी करु नका 2 महिन्यात चित्र बदलणार
कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी असले पाहिजे हाच विचार करुन रोहित पवारांनी दोन तालुक्याच्यामध्ये एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केल्याचे रोहित पवार म्हणाले. पण त्या एमआयडीसीला अडथळा आणण्याचे काम झाले. मी रोहितला सांगितले की, काळजी करु नको दोन महिन्याने चित्र बदलणार असल्याचे शरद पवार म्हणाले. 2 महिन्यात राज्याचे चित्र बदलेले की राज्यातील सर्व जिल्हे विकासाकडे वाटचाल करतील.