जामखेड न्युज——
जामखेडच्या तीन खेळाडूंची पुणे विभागीय शालेय वुशु स्पर्धेसाठी निवड
वराट, शिरगिरे व वाघमोडे यांना सुवर्णपदक
अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अ.नगर जिल्हा अमॅच्युअर वुशु संघटना आणि अमृतवाहिनी मॉडेल स्कूल, यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतवाहिनी मॉडेल स्कूल, संगमनेर येथे जिल्हास्तरीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धाध्ये श्रेयस वराट, मयूर शिरगिरे हे श्री नागेश विद्यालय जामखेडचे विद्यार्थी आहेत तर योगेश वाघमोडे हा ल.ना.होशिंग ज्युनियर कॉलेज, जामखेडचा विद्यार्थी आहे.
वराट, शिरगिरे व वाघमोडे यांनी सुवर्ण पदक मिळविले तर अंजली लोखंडे, राजनंदिनी गोरे दोन्ही कन्या विद्यालय, जामखेड यांनी रौप्य पदक मिळविले.
सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड पुणे विभागीय शालेय वुशु स्पर्धेसाठी झाली आहे. सर्व खेळाडू नवीन मराठी शाळा,जामखेड येथे वुशु जिल्हा संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष व प्रशिक्षक शाम पंडित, आबा जायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वुशु खेळाचा सराव करत आहेत.
सर्व यशस्वी खेळाडूंचे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे साहेब, तालुका क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, कर्जत-जामखेड चे आमदार रोहित दादा पवार, प्रा.राम शिंदे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्राचार्य बी. के. मडके, मयुर भोसले, अनिल देडे, लोखंडे सर, क्रीडा शिक्षक तालुका प्रमुख प्रल्हाद साळुंखे यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.