जामखेड न्युज——
सोयाबीन कापूसाला योग्य भाव द्यावा – रविकांत तुपकर
वर्षावरील आंदोलनाआधीच तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु आंदोलन करण्याआधीच पोलीसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतले आहे.

यावेळी जामखेड न्युजशी बोलताना तुपकर यांनी
सांगितले की, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. सोयाबीन कापूस मातीमोल किंमतीत विकले जात आहे. शेतकऱ्यांची प्रचंड लुट केली जात आहे. आणि बहिणीला पंधराशे रूपये दिले जात आहे. भावाची लाखो रूपयांची लूट आणि बहिणीला पंधराशे रूपये अशी विषमता आहे असे सांगितले.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात २३ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मात्र आंदोलनाआधीच रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वर्षा बंगल्याऐवजी आझाद मैदानावर आंदोलन करा, अशा सूचना पोलिसांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी त्यांनी वर्षा बंगला येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार आज ते वर्षा निवासस्थानी धडक देणार होते. मात्र वर्षा निवास्थानी आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा बंदोबस्त
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. अशातच आता तुपकर आंदोलन करण्यासाठी जाण्याआधीच त्यांना मरिन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, पोलीस मला कुठे नेतात ते बघू, त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरवू. पण सरकारला हे महागात पडेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव घेतलं ताब्यात
विधानसभा निवडणुकीच्या आधी सोयाबीनला 9 आणि कापसाला 12 हजार रुपये दर द्यावा. तसंच शेतकरी कर्जमाफी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. यासह विविढ मागण्या तुपकर यांनी सरकारकडे केल्या आहेत. या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आंदोलन पुकारले होते. मात्र आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आज शेतकरी कशाप्रकारे आत्महत्या करतात याचे प्रात्यक्षिक आंदोलन तुपकर आणि काही शेतकरी करणार होते.
सुरक्षेच्या कारणास्तव आणि परवानगी नसल्यामुळे चर्चगेट येथून तुपकर यांना पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले आहे.









