अँटी रॅगिंग प्रतिबंधात्मक जन जागृती कार्यशाळा जामखेड महाविद्यालयात संपन्न

0
591

जामखेड न्युज——

अँटी रॅगिंग प्रतिबंधात्मक जन जागृती कार्यशाळा जामखेड महाविद्यालयात संपन्न

 

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व जामखेड महाविद्यालय जामखेड आणि जामखेड विधी सेवा समिती, वकील सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अँटी रॅगिंग प्रतिबंधात्मक जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एल डोंगरे होते. प्रमुख मार्गदर्शक श्री. व्ही.व्ही जोशी दिवाणी न्यायाधीश जामखेड, वकील संघाचे उपाध्यक्ष श्री नितीन घुमरे, वकील संघ सदस्य श्री एम.एन नागरगोजे, श्री पी.जे. थोरात, श्रीमती गायत्री डोके, प्रा फलके ए.बी (कला शाखाप्रमुख), प्रा गाडेकर एस.एन (अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक), प्रा देशपांडे आर के (सांस्कृतिक विभाग प्रमुख) प्रा. मस्के जी.आर (विद्यार्थी विकास मंडळ ) अन्य मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना श्री व्ही. व्ही जोशी यांनी अँटी रॅगिंग संबंधी कायदे विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कधीच दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये, हा कायदेने गुन्हा आहे. आपल्या त्रासामुळे एख्यादे व्यक्तीचे जीवन नष्ट होऊ शकते. त्यामुळे असे वागू नये. असे आपले मत व्यक्त केले.

अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थी यांने शिक्षण घेत असताना नेहेमी न्रम आसवे न्रम विचाराने व्यक्ती संपन्न बनतो. महाविद्यालय परिसरात वागत असताना नियमाचे काटेकोर पालन विद्यार्थीने केले पाहिजे तसेच शांतीमय,प्रेमपूर्वक वातावरणात आपले शिक्षण पूर्ण करावे असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मोहळकर एस.डी यांनी केले. प्रास्ताविक प्रा.फलके ए.बी यांनी केले.आभार प्रा. मस्के जी.आर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी सहकार्य प्रा. फलके ए.बी. प्रा.केळकर प्रा.मसके. जी.आर प्रा.जाधव जी.एम प्रा किरदात जी.एल प्रा.महारनवर डी.एस, प्रा.भाकरे आर.ए, प्रा. मिसाळ टी.एम प्रा.मोहिते ए.डी, प्रा.कांबळे आर.ए यांचे लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here