जामखेड न्युज——
एअरटेल कंपनी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता ओ एफ सी केबल टाकुन रस्त्यांच्या साईडपट्टयाचे नादुरूस्ती करून रस्त्याचे अंदाजे रूपये 16,50,000/- (अक्षरी रूपये सोळा लक्ष पन्नास हजार फक्त ) नुकसान केले म्हणून सार्वजनिक बांधकाम विगागाने दिलेल्या फिर्यादी वरून जामखेड पोलीस स्टेशनला एअरटेल कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चांगदेव भिमराव बांगर वय-41 वर्ष धंदा-नोकरी रा.फ्लॅट नं -301 बी जी एस पॅरडाईज, कवी जगं लॉन्स पाठीमागे, गुलमोहर रोड, अहमदनगर,हल्ली रा.सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय जामखेड ता.जामखेड जि.अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी 1) कंपनीचे मालक 2) प्रोजेक्ट मॅनेजर 3) साईट इंजिनीयर (भारती एअरटेल लि. (पत्ता- ब्लॉक-1 वींग 1,2 लेवल 12,इंटरनेशनल टेक्नॉलॉजी पार्क 1344/3/4 वाघोली खराडी ग्रॅण्ड रोड पुणे) (पुर्ण नाव गाव माहीत नाही.) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
साखळी क्र.32/500 भाग झीक्री ते 38/00 भाग आमराई हॉटेल पर्यत रस्त्याचे पुर्वेस ता.जामखेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेता ओ एफ सी केबल टाकुन रस्त्यांच्या साईडपट्टयाचे नादुरूस्ती करून रस्त्याचे अंदाजे रूपये 16,50,000/- (अक्षरी रूपये सोळा लक्ष पन्नास हजार फक्त ) नुकसान केले आहे अशी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दि. 13 आँगस्ट रोजी दाखल करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे चांगदेव भिमराव बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एअरटेल कंपनी विरोधात साडेसोळा लाखांचे नुकसान प्रकरणी
गु.र.नं. व कलम :- 408/2024 भा न्या सं. 324(5),324(6) प्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील ठिकाणी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच वरील घटनेचा तपास सहाय्यक फौजदार शिवाजी भोस करत आहेत.