Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थ्यांनी बँकेशी आधार सोबत संलग्न करावे

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थ्यांनी बँकेशी आधार सोबत संलग्न करावे

0
668

जामखेड न्युज——

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना,
लाभार्थ्यांनी बँकेशी आधार सोबत संलग्न करावे

 


जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे ७ लक्ष अर्ज मंजूर झाले असून त्यापैकी साधारणपणे १ लक्ष २१ हजार अर्ज त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न नसल्यामुळे खात्यावर निधी वितरण होण्यास अडचण येत आहे.

लाभार्थ्यांच्या याद्या ह्या तालुकास्तरावर पंचायत समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी ज्यांची बँक खाते आधार कार्डशी संलग्न नाहीत अशा लाभार्थ्यांना तालुका स्तरावरून दूरध्वनीद्वारे लही संपर्क केला जाणार आहे.

लाभार्थ्यांनी त्यांच्या बँकेशी संपर्क साधून त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

कर्जत जामखेड तालुक्यात एकूण अर्ज 82500 अपेक्षित आहे. जे रिजेक्ट झाले आहेत तेही लवकरच त्रुटी दूर करून पुर्ण करण्यात येतील.

कर्जत-जामखेड मतदारसंघात ६५ हजार ७९९ अर्ज
आले असून ६४३७४ पात्र ठरले आहेत.
त्यात कर्जतमध्ये ३८ हजार १५२ पैकी ३७ हजार ४०३ मंजूर झाले आहेत. जामखेडच्या २७ हजार ६४७ महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी २६९७१ मंजूर झाले आहेत. जे अर्ज तात्पुरते अपात्र झाले आहेत. त्या अर्जाच्या त्रुटी लवकरच पुर्ण केल्या जातील.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ माझी लाडकी बहिण योजना नोंदणीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपले जे लंक्षाक आहे त्याची मुदत 31 आँगस्ट आहे पण आपण 25 तारखेपर्यंत सर्व अर्ज भरून लंक्षाक पुर्ण करावयाचे आहे.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करणे साठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना कार्यान्वित केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!