जामखेड न्युज——
अपयशाने खचून जाऊ नका – ऋषीकेश नेमाने
पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री साकेश्वर विद्यालयात सत्कार
जीवनात आपण प्रयत्न केला तरीही अनेक वेळा अपयश येते तेव्हा खचून न जाता जिद्दीने पुन्हा प्रयत्न करा चिकाटी व सातत्य ठेवा यश हमखास मिळतेच असे मत नवनियुक्त पोलीस म्हणून निवड झालेले ऋषीकेश नेमाने यांनी सांगितले.
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे ऋषीकेश नेमाने याची पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयात सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी तो बोलत होता.
यावेळी बोलताना ऋषीकेश नेमाने म्हणाला की, जीवनात यश मिळवण्यासाठी सातत्य ठेवा एकदा दोनदा अपयश आले तरी खचून जाऊ नका पुन्हा जिद्दीने प्रयत्न करा असे सांगितले. यावेळी बाबासाहेब कडभने यानेही मुलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक दत्ता काळे, अहिल्यानगरचे पोलीस बाबासाहेब कडभने, सोलापूर पोलीस पदी नियुक्ती झालेले ऋषीकेश नेमाने, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, प्रसाद होशिंग, मुकुंद वराट, विजय हराळे, अतुल दळवी, अण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह अनेक मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
ऋषिकेश भागवत नेमाने यांची (SRPF) पोलीस सोलापूर पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने छोटासा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
ऋषीकेश नेमाने याचे प्राथमिक चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा कडभनवाडी येथे झाले यानंतर पाचवी ते दहावी शिक्षण श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे झाले अकरावी बारावी ल. ना. होशिंग ज्युनियर काँलेज तर महाविद्यालयीन शिक्षण आष्टी येथील हबर्डे काॅलेज येथे झाले. नंतर नगर येथे बीएमडब्ल्यू अकॅडमी येथे अभ्यास केला. शेतकरी पुत्राची पोलीस पदी नियुक्ती झाल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.