जामखेड न्युज——
कडभनवाडी (साकत) शेतकरी पुत्राची पोलीस पदी नियुक्ती
सत्कारमूर्ती समवेत आई-वडिलांचाही शाळेत सत्कार संपन्न
तालुक्यातील साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या कडभनवाडी येथील शेतकरी भागवत नेमाने यांचा मुलगा ऋषीकेश नेमाने याची (SRPF) पोलीस सोलापूर पदी नियुक्ती झाली आहे. याबाबत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडभनवाडी येथे ऋषीकेश नेमाने व आई वडिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडभनवाडी शाळेत सत्कारमूर्ती चि.ऋषिकेश भागवत नेमाने यांची (SRPF) पोलीस सोलापूर पदी नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने छोटासा सत्कार समारंभ पालका समवेत मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
ऋषीकेश नेमाने याचे प्राथमिक चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा कडभनवाडी येथे झाले यानंतर पाचवी ते दहावी शिक्षण श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे झाले अकरावी बारावी ल. ना. होशिंग ज्युनियर काँलेज तर महाविद्यालयीन शिक्षण आष्टी येथील हबर्डे काॅलेज येथे झाले. नंतर नगर येथे बीएमडब्ल्यू अकॅडमी येथे अभ्यास केला. शेतकरी पुत्राची पोलीस पदी नियुक्ती झाल्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हा परिषद शाळा कडभनवाडी येथे सत्कार करण्यात आला याप्रसंगी साकतचे उपसरपंच राजूभाऊ वराट सुशेन कडभने (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), शरद मिसाळ, संदीप कदम, रामहरी राजपुरे, बाबासाहेब कडभने, सागर नेमाने, महेश कडभने, सुमित कडभने, ईश्वर नेमाने, भागवत उमरे, शिवलिंग नेमाने, अजित कडभने, संगीता कडभने (अंगणवाडी सेविका), श्रीम ऊर्मिला चव्हाण (शा. पो.आ. मदतनीस) आणि माता भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी ऋषिकेश नेमाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले की जि प च्या शाळेत हा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला त्याबद्दल दोन्ही शिक्षक उंडे सर व जेधे सर यांचे आभार मानून सांगितले की यश संपादन करायचे असेल तर कष्ट करावे लागते यशाला शॉर्टकट नाही त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून अभ्यास करावा असा मुलाचा संदेश त्यांनी दिला आणि श्री ऋषिकेश नेमाने (पोलीस सोलापूर) व श्री बाबासाहेब कडभने (पोलीस अहमदनगर) यांनी शाळेसाठी त्यांच्या पहिल्या पगारामधून 10000 रु किमतीचे अहुजा कंपनीचे साऊंड सिस्टीम शाळेस देऊ केले.
शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.