आई-वडिलांसह झालेल्या सत्काराने भारावून गेलो -बाबासाहेब कडभने कडभनवाडी जि.प.शाळेत नवनियुक्त पोलीस काॅन्स्टेबल बाबासाहेब कडभने यांचा सत्कार संपन्न

0
806

जामखेड न्युज——

आई-वडिलांसह झालेल्या सत्काराने भारावून गेलो -बाबासाहेब कडभने

कडभनवाडी जि.प.शाळेत नवनियुक्त पोलीस काॅन्स्टेबल बाबासाहेब कडभने यांचा सत्कार संपन्न

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेल्या जन्मदात्या आई-वडिलांसह माझ्या झालेल्या आजच्या सत्काराने मी भारावून गेलो असून कडभनवाडी शाळेचा मी सदैव ऋणी राहीन अशी प्रतिक्रिया नवनियुक्त पोलीस काॅन्स्टेबल बाबासाहेब कडभने यांनी कडभनवाडी येथील जि.प.च्या शाळेत झालेल्या सत्कारानंतर व्यक्त केली.


आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडभनवाडी येथे गावचे भूमिपुत्र बाबासाहेब श्रीराम कडभने यांची पोलीस कॉन्स्टेबल पदी अहिल्यानगर येथे निवड झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.


यावेळी बाबासाहेब कडभने यांच्यासह त्यांचे वडील श्रीराम नानासाहेब कडभने व आई सौ. सुनीता श्रीराम कडभने यांचादेखील सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी साकत ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाभाऊ वराट, सेवा संस्थेचे संचालक गणेश वराट, सचिन नेमाने ( ग्रा.प. सदस्य), सुशेन कडभने (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), निलेश नेमाने (उपाध्यक्ष), सदस्य तसेच संगीता कडभने ( अंगणवाडी सेविका), सुनीता कोल्हे (अंगणवाडी मदतनीस), सौ उर्मिला चव्हाण (स्वयंपाकी मदतनीस) यांच्यासह ग्रामस्थ ,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेतील शिक्षकवृंद संजय उंडे व विजय जेधे यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलीस काॅन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब कडभने यांचे सर्व स्तरांतून कौतूक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here