जामखेड न्युज——
संत तुळसापुरी महाराज यांचा संजीवन सोहळा उत्साहात संपन्न
जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील भुतवडा गावात आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी संत श्री तुळसापुरी महाराज यांची संजीवन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या संजीवन सोहळ्याला भुतवडा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळसापुरी महाराजांची प्रतिमा पालखीत बसवून वाद्यवृंदाच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील सर्व जण सामील झाले. महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावनचे कलश होते. त्या पाठोपाठ पुरुष मंडळींनी मिरवणुकीत डफड्याच्या तालावर लेझीम खेळले. गावात ज्या ठिकाणी महाराजांचे वास्तव होते, त्या मार्गाने मिरवणूक जाऊन शेवटी तुळसापुरी महाराज यांच्या जिवंत समाधी मंदिर येथे येते. सर्व भाविक भक्त समाधीची विधीवत पूजा करून आरती केली. त्यानंतर, महाप्रसादाचे वाटप करण्यात.
भुतवडा गावातील श्री संत तुळसापुरी महाराज यांची समाधी, श्री संत तुळसापुरी महाराज संजीवन सोहळ्यासाठी गावचे रहिवासी व आचलपुर येथे कार्यरत असलेले जिल्हा सत्र न्यायाधीश सत्यवान डोके म्हणाले, श्री संत तुळसापुरी महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी वर्षानुवर्षे गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक एकत्र येतात. तुळसापुरी महाराज नाथपंथीयांच्या परंपरेतील एक महान संत होऊन गेले. नाथपंथीच्या सर्वच संतांनी जनतेला आध्यात्मिक ज्ञान देऊन आपले कार्य दीनदुबळ्याच्या कल्याणासाठी आपले जीवन कृतार्थ करून संजीवन समाधी घेण्याची परंपराअबाधित ठेवली आहे.
तुळसापुरी महाराज मंदिर परिसराच्या विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मंदिर परिसर सुशोभित राहावा, यासाठी श्रमदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी हनुमान मंदिरासमोर भारूड रत्न कृष्णा जोगडंद यांचा एकनाथी भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला . भारूडच्या कार्यक्रमाने गावातील नागरीक, महिला, आबालवृद्ध आनंद लुटला.
यावेळी गावातील जिल्हा न्यायाधिश सत्यवान डोके, गटविकासधिकारी महेश डोके, जिल्हा बँकेचे संचलक अमोल राळेभात, शिवाजी डोके, भीमराव पवार, जयसिंग डोके,, सचिन डोके, गणेश डोके, राहुल डोके, बाजरंग डोके, श्रीराम डोके, संजय डोके, आशोक डोके, प्रा. सतिश डुचे, अशोक निमोणकर आदी उपस्थित होते.