नगर जिल्ह्यातील या तालुक्यात सापडला 150 किलो गांजा, चार जणांना घेतले ताब्यात

0
1773

जामखेड न्युज——

नगर जिल्ह्यातील या तालुक्यात सापडला 150 किलो गांजा, चार जणांना घेतले ताब्यात

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळ दगडवाडी फाटा येथे रविवारी सकाळी मुंबईतील अमली पदार्थ विरोधी पथकाने (एलसीबी) सुमारे 150 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना त्यांच्या दोन गाड्यांसह ताब्यात घेतले आहे. गांजाची किंमत जवळपास पस्तीस ते चाळीस लाख रुपयांच्या आसपास असेल.


पाथर्डी तालुक्यातील करंजी गावाजवळ दगडवाडी फाटा येथे रविवारी सकाळी मुंबईतील अमली पदार्थ विरोधी पथकाने (एलसीबी) सुमारे 150 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी चार जणांना त्यांच्या दोन गाड्यांसह ताब्यात घेतले आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पाथर्डी पोलीस ठाण्यात कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली
नव्हती.

तसेच आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मुंबईतील एलसीबी पथकाला कल्याण निर्मला या राष्ट्रीय महामार्गवर काही वाहनांमध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने ज्या गाडीत अमली पदार्थ आहे त्या गाड्यांवर पाळत ठेवली होती. ज्या वाहनामध्ये अमली पदार्थ होते, ती वाहने दगडवाडी फाट्याजवळ थांबली. त्यातील चारजण नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेय त्यावेळी अमली पदार्थ विरोधी पथकाने या गाड्यांची झडती घेतली असता या वाहनांमध्ये सहा गोण्यांमध्ये सुमारे 150 किलो गांजा आढळून आला.

या छाप्याची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांचे पथक दगडवाडी फाट्याजवळ गेले. मात्र, आमची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला माहिती दिली जाईल, असे या पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनीही भेट दिली.


याप्रकरणी पथकाने चार जणांना तब्यत घेत त्यांच्याकडे असलेली एक इनोव्हा आणि एक स्विप्ट कारही ताब्यात घेतली आहे. सायंकाळी उशिरा ताब्यात घेतलेल्या चार आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मुंबईच्या अमली पादर्थ विरोधी पथकाने
केलेली ही तालुक्यातील पहिलीच कारवाई आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here