जामखेड न्युज——
माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते
आरोही दादासाहेब नेमाने हिचा सत्कार

जामखेड तालुक्यातील पिंपळवाडी (साकत) येथील
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थींनी आरोही (पुनम) दादासाहेब नेमाने हीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा (लक्षवेध) मध्ये 98 टक्के गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आदर्श शिक्षक मनोहर इनामदार, राम ढवळे, आश्रू नेमाने, आरोही नेमाने यांच्या सह अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आरोही ही इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा लक्षवेध प्रज्ञाशोध या परीक्षेत आरोहीने शंभर पैकी 98 गुण घेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.

तिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडीचे मुख्याध्यापक राम ढवळे, वर्गशिक्षिका वर्षा जगताप (ढवळे) आजोबा आश्रू नेमाने, समृद्धी दादासाहेब घोलप यांचे मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकर, संजय वराट, प्रा. अरूण वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, सरपंच हनुमंत पाटील, दादासाहेब मोहिते, महारुद्र नेमाने, दिलीप घोलप, अशोक घोलप सह अनेक मान्यवरांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले होते.

पिंपळवाडी हे गाव साकत ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असून ग्रामस्थांनी लाखो रुपये लोकवर्गणी करून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा डिजिटल केली आहे. डिजिटल झालेली शाळा ही पिंपळवाडीची पहिलीच शाळा ठरली आहे.
आरोहीने राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामुळे पिंपळवाडीचे नाव पुन्हा राज्यात चमकले होते.
याबद्दल आज अहमदनगर येथे तिचा माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या सह विविध मान्यवरांच्या हस्ते आरोहीचा सन्मान करण्यात आला.






