जामखेड न्युज——
२००५ नंतरच्या शिक्षकांसाठी जून्या पेन्शनचा नक्की विचार करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
२००५ च्या अगोदरच्या शिक्षकांचेच पेन्शन प्रस्ताव येतायत परत

राज्यातील २००५ आधीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करून राज्य सरकारने शिक्षकांना दिलासा दिला होता. त्यानंतर २००५ नंतर रूजू झालेल्या शिकक्षकांना देखील जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी मागणी शिक्षकांकडून केली जात होती. ती मागणी लवकरच मान्य केली जाईल. २००५ नंतरच्या शिक्षकांसाठी जून्या पेन्शनचा विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता.२३) दिले. जळगाव येथे नाशिक शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

२००५ च्या आगोदर नोकरीस असलेल्या व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचेच पेन्शन प्रस्ताव परत येत आहेत. अद्याप शासनाचे परिपत्रक पेन्शन विभागास नाहीत. आणि आता मुख्यमंत्री म्हणतायेत २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना देण्याचा विचार करू जी आगोदर घोषणा केली होती तीचा जीआर निघणे आवश्यक आहे. २००५ च्या आगोदर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचेच पेन्शन प्रस्ताव परत येत आहेत.

यावेळी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, राजुमामा भोळे, मंगेश चव्हाण, लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह संस्थाचालकांसह मुख्याध्यापक, शिक्षण आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माता-पित्यानंतर समाजात जर कोणाला सर्वाधिक आदराचे स्थान असेल तर ते शिक्षकांना. शिक्षक हे राज्याचा कणा आणि वैभव असल्याने त्यांना आपल्याला दुखवायचे नाही. हीच आमची भूमिका आहे. त्यामुळेच २००५ नंतर नोकरीवर रूजू होणाऱ्या शिक्षकांच्या जूनी पेन्शन लागू करण्याचा नक्की विचार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

तसेच शिक्षक हे भावी पिढी घडवण्याचे काम करतात. त्यामुळे राजकर्ते म्हणून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवणे आमचे कर्तव्य आहे. याच भावनेतून २००५ आधीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू केली. तसेच २० टक्के वाढीव निधी देण्यासाठी ११६० कोटींची तरतूद केली. वैद्यकीय बिलासह पेन्शनसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही शिंदे म्हणाले. तर पुढील काळात शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून शिक्षकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व्यक्तीलाच विधानपरिषदेत पाठवा असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
आगोदर ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणेचा जीआर निघणे आवश्यक आहे नंतर पुढील घोषणा करावयास हवी २००५ च्या आगोदर नोकरीस असलेल्या शिक्षकांचेच पेन्शन प्रस्ताव परत येत आहेत आणि आता परत ही नवीन घोषणा





