Wednesday, February 11, 2026
Home राजकारण नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचा किशोर दराडे यांना जाहीर पाठिंबा वेगवेगळ्या संघटना...

नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचा किशोर दराडे यांना जाहीर पाठिंबा वेगवेगळ्या संघटना व शिक्षकांचा वाढता पाठिंबा ही आमच्या कामाची पावती – आमदार किशोर दराडे

0
184

जामखेड न्युज——

नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचा किशोर दराडे यांना जाहीर पाठिंबा

वेगवेगळ्या संघटना व शिक्षकांचा वाढता पाठिंबा ही आमच्या कामाची पावती – आमदार किशोर दराडे

नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर भिकाजी दराडे यांना नवयुग क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे किशोर दराडे यांचे पारडे जड झाले आहे. गेल्या सहा वर्षात आम्ही केलेल्या कामाची पावती आहे असे आमदार किशोर दराडे यांनी सांगितले.

नवयुग क्रांती शिक्षक संघटनेच्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आनंद होत आहे की माननीय किशोर भाऊ दराडे साहेब हे सातत्याने विनाअनुदानित, अंशतः शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासंदर्भात अतिशय चांगले असं योगदान असल्यामुळे तसेच अंशतः अनुदानित शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान मिळवून देण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समवेत बैठक घेऊन शंभर टक्के वेतन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावणे संदर्भात माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून शब्द घेतलेला आहे.

नाशिक विभागातील सर्व संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांना नम्रपणे विनंती करण्यात येत आहे
की, माननीय किशोरभाऊ दराडे यांना प्रथम पसंदीचे मतदान देऊन मतदारसंघांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपणास काम देण्यात येईल त्यांचे
काम मोठ्या ताकदीने व आनंदाने करण्याचे ठरवलेले आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत अनेक शिक्षक संघटना स्वयंस्पुर्तीने शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या कामाची दखल घेऊन आपला पाठिंबा व्यक्त करत आहेत.


आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या कामावर बेहद खुश असल्याने सर्व स्तरातून मिळणारा प्रतिसाद व पाठिंबा हीच आमच्या कामाची पावती आहे. मागील सहा वर्ष अव्याहतपणे शिक्षकांचे असंख्य प्रश्न तडीस नेणारे लोकप्रिय शिक्षक आमदार किशोर भिकाजी दराडे यांना आपले प्रथम पसंतीचे मत देऊन प्रचंड मताने विजयी करावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!