जामखेड न्युज——
जामखेडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त २५५ जणांनी केले रक्तदान
शिवराज्याभिषेक उत्सव समितीचा आदर्श सामाजिक उपक्रम
जामखेड मध्ये श्री शिवराज्याभिषेक उत्सव सोहळ्यानिमित्त श्री शिवराज्याभिषेक समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन दि १७ जून पासून सुरू आहेत. त्याप्रमाणे दिनांक १९ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे स. ९ ते ५ वा. या वेळेत तहसीलकार्यालय या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये २५५ रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून छत्रपती शिवरायांप्रती कर्तव्य पार पाडले.
गेली अनेक वर्षे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व शिवप्रेमी जामखेड येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करत आहेत चार दिवसींय सोहळ्यात अनेक सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
याचाच एक भाग म्हणजे “भव्य रक्तदान शिबिर” रक्तदान ही काळाची गरज आहे. रक्ताची निर्मिती कोण्या कारखान्यात होत नाही ती मानवीशरीरच करू शकते आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्यजिवन हे धावपळीचे झाले आहे.
त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा सामान करावा लागतो तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक हाॅस्पीटल मध्ये रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यामुळे प्रत्येक सशक्त नागरिकांनी रक्तदान करावे त्यासाठी शिवराज्याभिषेक उत्सव समिती दरवर्षी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत आहे.
नुकत्याच घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात २५५ जनांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीरा दरम्यान शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने कार्यकर्त्यांनी खास परीश्रम घेतले.