Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या फायक अली सय्यद व दत्तात्रय राऊत यांचा जामखेड पत्रकार संघ, जामखेड मिडिया...

फायक अली सय्यद व दत्तात्रय राऊत यांचा जामखेड पत्रकार संघ, जामखेड मिडिया क्लबच्या वतीने जाहीर सत्कार

0
485

जामखेड न्युज——

फायक अली सय्यद व दत्तात्रय राऊत यांचा जामखेड पत्रकार संघ, जामखेड मिडिया क्लबच्या वतीने जाहीर सत्कार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नगर जिल्हा निरीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद
तर जामखेड तालुकाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांची निवड झाल्याबद्दल जामखेड येथे जामखेड पत्रकार संघ तसेच जामखेड मिडिया क्लबच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा निरीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार फायक अली सय्यद व जामखेड तालुकाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांची निवडी बद्दल आज जामखेड मध्ये सत्कार करण्यात आला यावेळी जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, जामखेड मिडिया क्लबचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, अजय अवसरे, निलेश वनारसे, जाकिर शेख यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.


शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने जिल्हा कार्यकारणी ची मीटिंग आयोजित केली होती या मीटिंगमध्ये सर्वानुमते जिल्हा अध्यक्ष, जिल्हा निरीक्षक, तालुका अध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या. यात नगर जिल्हा निरीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद तर जामखेड तालुकाध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांची निवड यांच्या निवडी करण्यात आल्या याबद्दल अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई. या संघटनेच्या अ. नगर जिल्हा निरीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. तर जामखेड तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांची निवड करण्यात आली व तसे त्यांना दोघांना निवडीचे पत्र देण्यात आले. या दोघांच्या निवडीबद्दल जामखेड शहरात व तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या मिटींग मध्ये त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई. चे राज्य सरचिटणीस मा. विश्वासराव आरोटे हे उपस्थित होते. राज्य निरीक्षक म्हणून भाऊसाहेब वाकचौरे पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल आज जामखेड पत्रकार संघ व जामखेड मिडिया क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!