Wednesday, February 11, 2026
Home क्राईम न्यूज जामखेड तालुक्यात वृध्द महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटले ...

जामखेड तालुक्यात वृध्द महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटले चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

0
977

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात वृध्द महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकूचा धाक दाखवून लुटले

चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

घराच्या समोर झोपलेल्या वृध्द महीलेस रात्रीच्या सुमारास चाकुचा धाक दाखवून व मारहाण करत चार अज्ञात चोरट्यांनी महीलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी चार अज्ञात चोरट्यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील धानोरा येथे वृध्द फिर्यादी महिला सुशिल मोहन निंबाळकर वय 65 व त्यांचे पती हे शेतातील घरासमोर दि 15 जुन रोजी झोपले होते.


यावेळी रात्री सव्वा दहा वाजता चार अज्ञात चोरटे त्या ठिकाणी आले व फिर्यादी महिला व पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एकाने चाकुचा धाक दाखवून वृध्द महीलेच्या अंगावरील सोन्याचे मणीमंगळसुत्र व कानातील सोन्याचे फुले असा एकुण 24 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला

या घटनेनंतर परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जामखेड तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे हे वरील घटनेवरून दिसुन येत आहे.


चोरट्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पगारे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!