जामखेड न्युज——
जामखेड तालुका विवेक कोल्हेच्या पाठिशी राहणार – उपप्राचार्य डॉ. सुनील नरके
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात युवा नेते अमित कोल्हे यांचा जामखेडमध्ये मतदारांशी संवाद

शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे त्या सोडविण्यासाठी तळमळ दाखविणारे सर्व समावेशक नेतृत्व माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांच्या पाठिशी संपूर्ण जामखेड तालुका राहिल. असे मत जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील नरके व्यक्त केले.

युवा नेते अमित कोल्हे यांनी आज जामखेड तालुक्यातील मतदारांशी संवाद साधला साधला यावेळी त्यांचा सत्कार जिल्हा बँकेत करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, जामखेड महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनील नरके, उपप्राचार्य पोपट जरे, अनिल देडे, सुदाम वराट, तालुका प्रमुख विकास वाबळे, सागर गांधी, दिलीप चोळके, सोपानराव कदम, किरण आहेर, धनंजय चोळके, लहरे सर, लक्ष्मण शिंदे, सुनिल कुंभार सर यांच्या सह जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे अनेक शिक्षक उपस्थित होते.

यावेळी डॉ सुनील नरके म्हणाले की, राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांची तळमळ आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक कोल्हे यांच्या बरोबर राहतील.
यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट म्हणाले की, जुन्या पेन्शन बरोबरच प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी कोल्हे साहेबांनी प्रयत्न करावा.

विवेक कोल्हे यांच्या मते शिक्षक हे देशाचा कणा आहेत. ते राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात. मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी मला अनेकांनी मागणी केल्यानंतर विधानपरिषद लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे.अनेक शिक्षक संघटना,पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे असे सांगितले.
विवेक कोल्हे म्हणतात आपण मिळून हे साकार करू
जुनी पेन्शन, माझे वचन
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी आणि नंतर नोकरीला लागलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी आणि त्यांचे टेन्शन मिटावे यासाठी निकराचा लढा देणार. सरकार कुणाचेही असो, कोणत्याही पक्षाचे असो मी विधानपरिषदेत आणि रस्त्यावर लढाई लढणार आणि पेन्शनचा हक्क मिळवून देणार, अन्यथा आपल्याकडे पुन्हा मत मागायला येणार नाही.

एक वर्षांची प्रसूती रजाआणि बाल संगोपन कक्ष
महिला शिक्षिकांची प्रसूती रजा १८० दिवसावरून एक वर्षे करणे, फीडिंग मदरसाठी
शाळांमध्ये स्वतंत्र व्यवस्था करणे, शाळांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह, मोफत आरोग्य तपासणी आणि रजोनिवृत्तीच्या काळात मानसिक स्थितीत बदल झालेला असतो त्या काळात अतिरिक्त कामांचा बोजा कमी करणे, बदल्या न करणे आदी बाबतीत शासन स्तरावरून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडणार.
शिक्षकांच्या मुलामुलींसाठी, कुटुंबीयांसाठी
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मुला-मुलींसाठी शिक्षण घेण्यासाठी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार. शिक्षकांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी देशात आणि परदेशात आर्थिक मदत मिळावी आणि कमी व्याज दराने शैक्षणिक कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न करणार. शिक्षकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना सवलतीत / मोफत वैद्यकीय कॅशलेस
सेवा सुविधा मिळावी म्हणून प्रयत्न करणार.
तंत्रज्ञानाच्या नावाखालची पिळवणूक रोखणार
शिक्षक मान्यता झाली असेल तर शालार्थ आयडी घेण्याची आवश्यकता नाही यासाठी प्रयत्न
करणार. त्यातून शिक्षकांची होणारी पिळवणूक थांबविणार, या व्यतिरिक्त प्रलंबित पुरवणी
बिल, वैद्यकीय बिल आदी सादर केल्यानंतर कालमर्यादेत त्यांना मंजुरी मिळाली पाहिजे यासाठी धोरण आणण्यास शासनाला बाध्य करणार.
सेवा सुरक्षा हमी
खासगी आणि सरकारी शाळांतील कर्मचाऱ्यांना सेवा सुरक्षा मिळावी यासाठी शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडणार.
विनाअनुदानित सेवकांचा लढा सोडविणार तीढा
विना अनुदानित तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधानपरिषदेच्या पहिल्याच अधिवेशनात मांडणार आणि सोडवून घेणार.
अशैक्षणिक कामांना आळा.
शालाबाह्य कामे दिल्याने शिक्षक त्रस्त होतात. त्याचा परिणाम अध्यापनावर होतो. त्यामुळे बी.एल.ओ., जातनिहाय जणगणना, शासकिय सर्वे यासारख्या कामामुळे त्यांच्या आरोग्यावर परीणाम होतो. त्यामुळे सर्व शिक्षकांची शालाबाह्य कामे त्वरित बंद करावीत अशी मागणी मी करत आहे.
यामुळे तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक विवेक कोल्हे यांच्या पाठिशी उभे राहणार आहेत.


