जामखेड न्युज——
राज्यस्तरीय किक बॉक्सिंगमध्ये जामखेडला सहा सुवर्णपदक, दोन रोप्य तर दोन काश्य पदके
यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव
अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा स्पर्धांमध्ये जामखेड च्या खेळाडूंनी मार्गदर्शक ज्ञानेश्वर जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त कामगिरी करत सहा सुवर्णपदक, दोन रजत, दोन काश्य पदके पटकावले आहेत यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्राचे प्रेसिडेंट निलेश शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेले स्पर्धेत वाडिया पार्क येथे स्पर्धा घेण्यात आल्या एकूण 900 विध्यार्थी सहभागी होते. जिल्हा अध्यक्ष सचिन मकासारे , कोच ज्ञानेश्वर जमदाडे सर, गोकुळ सर, महिंद्र सर, ओंकार सर, थापा सर, जेयश सर व इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट शाहनवाज शेख व ओंकार राठोड उपस्थित होते.
या स्पर्धेत संकेत जमदाडे ह्याने म्युझिकल ,पॉइंट फाईट व लाईट कोनट्याक मध्ये आशे 3 गोल्ड मेडल मिळवले आहे. सानिका हुलगुंडे हिने म्युझिकल व लाईट कोनट्याक मध्ये 2 गोल्ड मेडल मिळवले आहे. शिवानी वीर हिने किक लाईट मध्ये गोल्ड मेडल तर पॉइंट फाईट मध्ये सिलवर मेडल मिळवले आहे. ऋषिकेश बाबर ह्याने लाईट कोनट्याक मध्ये सिलवर मेडल मिळवले आहे.
बुद्धभूषण अव्हाड ह्याने म्युझिकल मध्ये ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. तर कार्तिकी पोतदार हिला पण म्युझिकल मध्ये ब्राऊन्स मेडल मिळवले आहे. सहभागी विध्यार्थी वैष्णव जायभाय, नुपूर सातपुते, आर्यन ढवळे. तर जामखेडने एकूण गोल्ड मेडल 6 मिळवले आहे. तर 2 सिलवर, 2 ब्राऊन्स मेडल मिळवले आहे.
तर विध्यार्थ्यांची नॅशनल साठी निवड झाली आहे. तर जामखेडचे माकोडे सर, नितीन मोहोळकर सर, धनगडे सर, साळुंखे सर शिवसेना अध्यक्ष संजय काका काशीद यांनी सुद्धा कौतुक व अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.