Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये ट्राँफिक जँमची समस्या रोजचीच, वाहनचालक हैराण

जामखेडमध्ये ट्राँफिक जँमची समस्या रोजचीच, वाहनचालक हैराण

0
652

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये ट्राँफिक जँमची समस्या रोजचीच, वाहनचालक हैराण

 

जामखेड शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे
गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेले जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्ता एक पट्टी तयार तयार झाली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एका बाजूचाच रस्ता सुरू आहे. बीड काँर्नर ते बस स्थानकापर्यंत दररोजच ट्राँफिक जाम होत आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

रस्त्यावर फुपाटा कमी व्हावा म्हणून पाणी मारले जाते यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खरटे तयार झाले आहेत यावर दररोज अनेक गाड्या घसरतात यातही अनेक जण जखमी झाले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे. दिवसभर मोठ्या प्रमाणात रहदारीची समस्या असते.

जामखेड हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार समजले जाते यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असते यामुळे बीड कार्नर पासून बस स्टॅन्ड पर्यंत प्रवासासाठी खुपछ वेळ लागतो. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने होत आहे. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याची एक पट्टी तयार झाली आहे पण यावर दोन गाड्या बसत नाहीत. यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत आहेत. साकत फाटा ते नायरा पेट्रोल पंप या चारशे मीटर अंतरावर सहा महिन्यात अनेकवेळा अपघात झाले आहेत यात दोघांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. लवकरात लवकर रस्ता काम व्हावे अशी मागणी होत आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे. डीएलसी क्राँक्रेटला अनेक ठिकाणी तडे तसेच कच्च्या थराच्या सिंमेटची पुर्णपणे राख झाली आहे. त्यावरच पक्का थर टाकला कामाची जेवढी जाडी हवी तेवढी जाडी नव्हती. तसेच गटार कामे सरळ रेषेत नाहीत. वाकड्या तिकड्या गटारी कामे तसेच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी गटार कामे एकसलग नाहीत. पाणी नीट मारले जात नाही त्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.

महामार्गाच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे. तसेच मातीमिश्रीत मुरूम त्यावर मारलेले पाणी यामुळे अनेक लोक गाडीवरून घसरून पडतात यात अनेकांना अपंगत्व आले आहे. तर चार महिन्यात दोन मृत्यू झाले आहेत. ताबडतोब रस्ता कामाची गती वाढवावी तसेच चांगले काम करावे अशी मागणी होत आहे.

जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धुळीमुळे जामखेड परिसरातील वाहनधारक व नागरिक एक वर्षापासून हैराण आहेत. काही ठिकाणी गटारे केले आहेत. तेही कमी जाडीचे आहेत तर अनेक ठिकाणी गटाराच्या कामाला चिरा पडल्या आहेत. यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाला कोणत्याही ठिकाणी सुरक्षिततेसाठी काहीही नाही. यामुळे वारंवार अपघात होत आहेत या चार दिवसात नायरा पेट्रोल पंप ते साकत फाटा या दरम्यान हा सहावा अपघात आहे. राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या संथगती कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आणखी किती बळी घेणार हा खरा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!